राज्यसभेत कोरोनावरील चर्चेदरम्यान आरजेडीचे खासदार मनोजकुमार झा म्हणाले की,ज्यांचे मृतदेह गंगेत तरंगत होते त्या सर्वांची सदनाने माफी मागितली पाहिजे.परंतु त्यांना कधीही स्वीकारले गेले नाही.
कुणी म्हणाले इकडून वाहून आले कुणी म्हणाले तिकडून वाहून आले.कोरोना संकटाच्या वेळी ऑक्सिजनच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित करीत झा म्हणाले की, खासदार असूनही ते जनतेला मदत करू शकले नाहीत. भाषणादरम्यान मनोज झा यांनी सोबत आणलेल्या चिठ्ठी मध्ये लिहिलेल्या अशा काही गोष्टी वाचल्या, त्याबद्दल सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालत आक्षेप घेतला.
खासदार मनोजकुमार झा म्हणाले,एखाद्या गावातील एखादी गरीब व्यक्ती
जर एक साबणाची वडी विकत घेत असेल तर तोही अदानी अंबानी प्रमाणे देशाला तेवढाच कर भरतो.
त्यामुळे या देशात काहीही फ्री कुणी देत नाही.तसं समजू नये.
मुफ्त वॅक्सिन मुफ्त इलाज मुफ्त राशन म्हणजे मोफत वॅक्सिन मोफत इलाज मोफत राशन असं काहीही नसतं.
(हे समजून घेताना असं बघा.) आपल्या देशात वेलफेअर स्टेट अशी संकल्पना आहे.नागरिकांचा हक्क अधिकार आहे.
नागरिकांना या सुविधा देण्याचे वचन स्टेट वेलफेअर मध्ये दिलेले आहे.(त्यावर प्रत्येक गोष्टीत कर भरावा लागतो.)
(हा कर राज्याच्या अन अनुषंगाने देशाच्याच तिजोरीत जमा होतो.)त्यामुळे नागरिकांना आपण मोफत देतोय असं म्हणून त्यांना अपमानित करू नका.त्यांना खुजे करू नका.असा माझा आग्रह आहे असेही खासदार मनोजकुमार झा म्हणाले.
हे भाषण/वक्तव्य संसदेत केलेले असल्याने त्याला एक वेगळे महत्व आहे.
दरम्यान,कोरोना साथीच्या आजारात ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे कोणत्याही राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशातून मृत्यू झाल्याचे वृत्त नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
राज्यसभेत विचारलेल्या उत्तरात केंद्र सरकारने हे उत्तर दिले.
या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्र्यांनी असा दावा केला की
कोविडच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू झाला हे खरे आहे का,असे सरकारला विचारले गेले.
सरकारच्या वतीने, आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी लेखी उत्तरात सांगितले की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि कोविडमुळे त्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे,परंतु यात ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे मृत्यूची नोंद झाली नाही.
Sayli Kamble Indian Idol;जातीपेक्षा मराठी असल्याचा प्रचार झाला पाहिजे
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JULY 21, 2021, 13:10 PM
Web Title – MP Manoj Jha: We should apologize for the bodies floating in the Ganges 2021-07-21