सर्वात मोठं किंवा महागडं नाणं लवकरच बाजारात दाखल होत आहे.तब्बल 75 रुपये मूल्य असणारं नाणं लवकरच बाजारात दाखल होत आहे.75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे नवीन संसद भवन च्या उद्घाटन प्रसंगी सरकारकडून 75 रुपयांचे हे विशेष नाणे (Rs. 75 Coin Launch) जारी केले जाणार आहे. अर्थ मंत्रालयानं याबाबतची अधिक माहिती दिली.
विशेष 75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु रुपयांचे नाणे
75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु रुपयांचे विशेष नाणं भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने चलनात आणले जात आहे. या विशेष नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र ठळकपणे कोरलेले असेल,तसेच त्याच्या खाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं असणार आहे. तसेच डाव्याबाजूला देवनागरी लिपीत ‘भारत’ अन उजव्याबाजूला इंग्रजीत ‘इंडिया’ असं लिहिलेलं असणार आहे.
नवीन संसद भवन चित्र
75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु रुपयांच्या या विशेष नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवन संकुलाचं चित्र असेल.
तसेच वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘संसद परिसर’ आणि चित्राच्या खालील बाजूस ‘Parliament Complex’ असं लिहिलेलं असणार आहे.
चार धातूंचं बनलंय नाणं
सदर नविन नाण्याचा आकार गोलाकार असून त्याचा व्यास 44 मिमी असणार आहे. 35 ग्रॅमचं हे नाणं चार धातूंचं बनलंय.
त्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के जस्त असणार असल्याची माहिती समोर आलीय.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवीन संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे.
सरकारकडून अशा विविध विशेष प्रसंगी नवनवीन नाणी जारी केली जात असतात.
विरोधकांचा उद्घाटनावर बहिष्कार
दुसरीकडे नव्या संसद भवनाच्या उद्घाटन मुद्यावर वाद सुरूच असून.विरोधकांनी हा राजकीय मुद्दा बनवला आहे. Congress काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप) AAP यांच्यासह बहुतांश विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 26, MAY 2023, 12:45 PM
WebTitle – Rs 75 New Coin