
कानपूरमध्ये करवाचौथ साजरा करण्यासाठी सासरी आलेल्या पोलिस कर्मचारी महिलेवर उशिरा रात्री गावाबाहेर एका युवकाने जबरदस्तीने उचलून निर्जन शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस कर्मचारी महिलेने प्रतिकार केला, ज्यात तिचा एक दात तुटला. दरम्यान,तिने आरडाओरड केली, तेव्हा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कानपूरच्या सेन पश्चिम पारा भागातील रहिवासी असलेल्या या महिला हेड कॉन्स्टेबलची अयोध्येमध्ये पोस्टिंग होती. करवाचौथ साजरा करण्यासाठी ती शनिवारी अयोध्येतून कानपूर या आपल्या गावी आली होती, जिथे तिला रस्त्यावर उतरल्यानंतर गावात पायी जावे लागले.
कानपूरमध्ये करवाचौथ साजरा करण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचारी महिलेवर बलात्कार
रात्रीची वेळ असल्यामुळे ती उशिरा पोहोचत होती. साध्या कपड्यांमध्ये असलेल्या कॉन्स्टेबलला गावाच्या अगोदरच एका युवकाने जबरदस्तीने निर्जन शेतात ओढून नेले.महिला कॉन्स्टेबलने प्रतिकार केला, परंतु त्याने तिचे कपडे फाडले आणि बलात्काराचा प्रयत्न केला.
अयोध्येमध्ये आहे ड्युटी
हिंदी वृत्तवाहिनी आजतक ने दिलेल्या बातमीनुसार,पोलिस कर्मचारी महिलेचे सासर कानपूरच्या सेन पश्चिमपारा भागात आहे. तिची ड्युटी सध्या अयोध्येत आहे. माहितीनुसार, करवाचौथ साजरा करण्यासाठी ती शनिवारी अयोध्येतून कानपूरमधिल आपल्या गावी आली होती.
पोलिस कर्मचारी महिलेने युवकाची बोट चावले
या झटापटीदरम्यान पोलिस कर्मचारी महिलेने प्रतिकार करताना आरोपीच्या एका बोटाला चावा घेतला, ज्यात तिचा एक दात तुटला.
पोलिस कर्मचारी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे लोक धावत आले, तेव्हा युवक पळून गेला.
महिला सिपाईने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपी धर्मेंद्रला अटक केली आहे.
पोलिसांचे म्हणणे काय आहे?
घाटमपूरचे एसीपी रंजीत कुमार यांनी सांगितले की, पोलिस कर्मचारी महिला या साध्या कपड्यांमध्ये आपल्या घरी जात असताना,
सुनसान जागा पाहून आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिला शेतात ओढून नेले व बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणात आरोपीला अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

चेहऱ्यावर डाग आणि कापलेली बोट असल्याने आरोपीला पकडले
एडीसीपी मनोज पांडे यांनी सांगितले की, बलात्काराच्या आरोपाखाली सेन पश्चिम पारा क्षेत्रातील रहिवासी धर्मेंद्र उर्फ कल्लू याला पकडले आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. चेहऱ्यावर डाग आणि बोट कापलेले असल्याने आरोपीला ओळखता आले. हेड कॉन्स्टेबलसोबत झालेल्या बलात्कारानंतर पोलिस सक्रिय झाले आणि परिसरात शोधमोहीम राबवली. चेहऱ्यावरच्या कापलेल्या खुणा आणि कापलेली बोट पाहून पोलिसांनी आरोपीला पकडले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 21,2024 | 20:20 PM
WebTitle – Kanpur: Attempted Rape of Female Constable Returning for Karva Chauth, Suspect Arrested