मुंबई/ प्रतिनिधी – लेणी संवर्धक वकील संघ, पुणे यांचे विद्यमाने कान्हेरी बुद्ध लेणी, बोरिवली याठिकाणी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते,यावेळी कार्यशाळेत ४५ वकील बंधू भगिनींनी सहभाग घेतला.लेणी संदर्भात जणजागृती व संवर्धन करण्याची प्रेरणा घेवून ऐतिहासिक वारसा जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर कार्यशाळेत धम्मलिपि तज्ञ, लेणी अभ्यासक सुनिल खरे ,नाशिक. यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते, त्यांनी कान्हेरी लेणीची माहिती दिली तसेच येथील शिलालेख वाचन करून दान दात्यांची नावे यावेळी सांगण्यात आली.
कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण करण्याची बुद्ध कालिन पध्दत
पाण्याचे शुद्धीकरण करण्याची पध्दत आपल्याला कान्हेरी बुद्ध लेणी मधील स्थापत्यकलेतून दिसून येते.नाशिकच्या व्यापाऱ्याने दान दिल्याचा शिलालेख ह्या ठिकाणी असून त्याचे वाचन व लिप्यातर करण्यात आले,सदर कार्यशाळेत ॲड. राजेश नितनवरे, ॲड. रविंद्र वाघमारे, ॲड. अक्षय ननावरे, ॲड. वैभव धनकुडे, ॲड. श्रीनिवास खुंटे, ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. लक्ष्मण जगधने, ॲड. सुजीत रणधीर, ॲड. विशाल पारवे, ॲड. कुंडलिक वाघमारे, ॲड. कैलास अहिवळे, ॲड. राजरत्न शाक्य, ॲड. प्रविण अहिरे, ॲड. भिवराज रणखांबे, ॲड. संभाजी वाघमारे, ॲड. प्रियंका खंडागळे, ॲड. प्रतिभा शाक्य, ॲड. श्रीजीत कदम, ॲड. सुभाष म्हस्के, ॲड. कार्तिक शिवशरण,अॅड शितल भोसले ॲड. पुर्णज्योती, ॲड. मिलींद घोगरे अॅड मल्लिकार्जुन शाक्य , अॅड संजय गायकवाड , प्रमिला गायकवाड , शुद्धोधन बागडे, मिराताई वाघमारे, वैशाली शाक्य , जीवन, गायकवाड,कामेश साळवे सह अनेक बांधव वकील सहभागी होते.
यावेळी उपस्थित सर्व वकील बांधवांना अशोक कालीन धम्मलिपिची वर्णमाला सेट दान पारमिता फाउंडेशन तर्फे भेट देण्यात आले,
आयोजकांनी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था कार्यशाळेत सहभागी उपासकांसाठी केलेली होती,
सदर कार्यशाळेचे आयोजन ॲड. अजय विलास डोळस, ॲड. राहूल गौतम ढाले, ॲड. सुमेध सुदाम घनवट यांनी केले.
‘अटक वेगाने, खटल्याच्या वेळी मात्र ईडी मंद’, न्यायाधीश नी फटकारले
५० लाखांची लाच घेताना BMC अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
बजरंग दल चा नेता,टोल भरण्यास नकार, पत्नीची केस ओढत भर रस्त्यात मारहाण
VIDEO : गुजरात मध्ये केबल पूल कोसळला 400 लोक पाण्यात,काही लटकले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 13,2022, 19:15 PM
WebTitle – The sound of Buddham Sharanam Gachchami echoed in the Kanheri Buddha cave