पुणे, दि. 15 मे 2025 – जातपडताळणी ,जातवैधता प्रमाणपत्र हे लवकरच एका क्लिकवर ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि टीसीएसच्या वतीने ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रमाणपत्रात समाविष्ट केलेल्या छायाचित्रामुळे गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे.
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील नागरिकांना सरकारी नोकरी, शैक्षणिक, निवडणूक आणि सरकारच्या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या अन्य कोणत्याही कामकाजासाठी मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
जातपडताळणी प्रमाणपत्र आता ऑनलाइन
जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेदरम्यान अर्जदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचणी येतात. त्यामुळे जातप्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे अर्जदारांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आंधार क्रमांकासह एकत्रीकरण असणार आहे. यात नाव, वडील किंवा पतीचे नाव, आधारमध्ये नमूद केलेले मूळ स्थान यासारख्या मूलभूत माहितीची तपासणी होईल आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी डीजी लॉकर या अॅपचे एकत्रीकरण (इंटिग्रेशन) असणार आहे. याबाबत टीसीएसने सादर केलेला प्रस्ताव बार्टीने राज्य सरकारला प्रस्ताव दाखल केला होता.
या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. ही प्रणाली दोन महिन्यांत कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही प्रणाली विकसित करण्यासाठी ‘टीसीएस’ला २५ कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येणार आहे.
पाच वर्षे प्रशिक्षण, देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी ‘टीसीएस’ या कंपनीवर असणार आहे.
असा आदेश सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिला आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 15,2024 | 17:30 PM
WebTitle – Caste validity certificate will soon be available online