बौद्ध समाजाकडून ‘पोलीस उपनिरीक्षक पदी’ सातव्या क्रमांकाने निवड झालेल्या आदर्शगावच्या अभिजित विलास केणे यांचा ‘भारतीय संविधानाची’ प्रत देऊन नागरी सत्कार..
जयसिंगपूर/प्रतिनिधी -दि.८ जुलै रोजी एस.एम.जी.स्मृती प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व युवा विचारमंच गोठणेगाव वसाहत,दानोळी ता.शिरोळ यांचेवतीने महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेत सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या धरणग्रस्त वसाहत आदर्शगावच्या अभिजित विलास केणे यांचा नागरी सत्कार धरणग्रस्त वसाहतीच्या स्नुषा व सध्या महाबळेश्वर तालुका दंडाधिकारी म्हणून सेवा बजावत असलेल्या आदर्श महिला प्रशासकीय अधिकारी तेजस्विनी महेश पाटील यांचे हस्ते भारतीय संविधानाची प्रत देऊन करणेत आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचाचे मार्गदर्शक शाहीर दिपकभाई गोठणेकर हे होते.
![अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2023/07/Abhijit-Vilas-Kene-felicitated-for-being-selected-as-Sub-Inspector-of-Police-3.webp)
वसाहतीतील बौद्ध विहार हे सर्वांसाठी खुले
![अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2023/07/Abhijit-Vilas-Kene-felicitated-for-being-selected-as-Sub-Inspector-of-Police-55.webp)
सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अभिजित यांनी “अत्यन्त कष्ठाने व प्रतिकुल परिस्थितीत यश मिळवलेचे सांगितले,
शिवाय पुढील काळात तरुणांना मार्गदर्शन व सर्वोतोपरी मदत करत,संविधानाप्रती निष्ठा ठेवून प्रशासकीय सेवा बजावणार असलेचे” ते म्हणालेत.
तहसीलदार मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,”तरुणांनी चिकाटीने अभ्यास करून ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.जर तुम्ही योग्य वयात योग्य दिशेने अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितच कोणत्याही परिस्थिती यश संपादन करता येऊ शकते”असे त्या म्हणाल्यात.
![अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2023/07/Abhijit-Vilas-Kene-felicitated-for-being-selected-as-Sub-Inspector-of-Police-4-1024x545.webp)
यावेळी गोठणेकर यांनी सांगितले की, ‘वसाहतीतील बौद्ध विहार हे सर्वांसाठी खुले असून,डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र म्हणून ते चालवत असताना, दूरदृष्टी ठेवून,केंद्राद्वारे विविध उपक्रम राबवून,स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी,विविध कलागुण,क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व करियर घडवू इच्छिणा-याना प्रतिष्ठान मार्फत नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य करणेत आले आहे.शिवाय यशस्वी गुणवंतांचा व कार्यकुशल प्रतिभावंतांचा गुणगौरव व सत्कार करणेत विचारमंचाच सातत्याने पुढाकार राहिला आहे.”
संविधांनामुळेच,तरुणांना स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनात जाण्याची संधी
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणारे, करियर समुपदेशक महेश पाटील यांनी सत्कारामूर्तीस संविधानप्रत देऊन गौरव केल्याबद्दल संयोजकाचे विशेष कौतुक करून ते म्हणाले की,” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधांनामुळेच,तरुणांना स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनात जाण्याची संधी मिळत आहे व पुढेही संविधान कायदाआधारेच प्रशासकीय सेवा व कार्य त्यांच्याकडून बजावले जात असलेने विचारमंचाने संविधान भेट देऊन केलेला सत्कार हा अभिनव व यथोचित आहे” असे ते म्हणालेत.
![अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2023/07/Abhijit-Vilas-Kene-felicitated-for-being-selected-as-Sub-Inspector-of-Police-5.webp)
यावेळी सह्याद्री मंडळाचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते धनाजी केणे
व रमाई महिला संघाच्या शीतल गोठणेकर यांनी तहसीलदार पाटील मॅडम यांचा सत्कार केला
तसेच आपल्या भाषणाद्वारे अभिजित केणे यांचे अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Read also छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बुद्ध विहारात साजरी
कार्यक्रमाची सुरुवात भ.बुद्ध मूर्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेचे पूजन करून करणेत आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी केले स्वागत अध्यक्ष विजय गोठणेकर यांनी तर आभार उपाध्यक्ष रणधीर कांबळे यांनी मानले, कार्यक्रमाचा गोडसमारोप सत्कारमूर्ती व त्यांचे वडील विलास केणे आणि उपस्थित मान्यवरांना पेढा भरवून करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन विनोद कांबळे,अजय कांबळे,संजय कांबळे, प्रकाश कांबळे,रवी तांबे,
निलेश कांबळे,सचिन कांबळे,प्रज्वल कांबळे,संदेश कांबळे,प्रशिक कांबळे,सम्यक गोठणेकर,जीवक गोठणेकर यांनी केले.
यावेळी आदर्शगाव वसाहतीतील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील,श्रमिक मुक्तीदलाचे संघटक दाऊद पटेल,
भिकाजी केणे,रणधीर केणे,काशिनाथ कांबळे,समीर चौगुले सह गोठणेवसाहत मधील बौद्ध समाजाचे लहान थोर स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते..
![](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2023/06/Google_news_png-logo-jaglya-jaaglyabharat.png)
click here
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 09,2023 18:38 PM
WebTitle – Abhijit Vilas Kene felicitated for being selected as ‘Sub-Inspector of Police’