मुंबई: सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपट बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.मराठी चित्रपटसृष्टीमधिल एक अभ्यासू आणि सामाजिक भान असणारा दिग्दर्शक अशी नागराज मंजुळे यांची ओळख आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं पाहायला अन अनुभवायला मिळतं.सैराट,फॅन्ड्री,झुंड अशी काही उदाहरणे आहेत. हे चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले होते.त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाकडे लोकांचं लक्ष लागून असतं. ‘नाळ’ या गाजलेल्या मराठी चित्रपटात नागराज मंजुळे यांनी देखिल भूमिका केली होती. या चित्रपटाचं कथानक आणि त्यातील बालकलाकारपासून ते सर्व दिग्गज कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना एक भारावून टाकणारा भुरळ पाडणारा असा अनुभव होता. नागराज मंजुळे यांनी आता पुन्हा एकदा लोकांना भुरळ पाडण्यासाठी नव्या प्रोजेक्टची घोषणा केलीय,’नाळ 2′ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नागराज यांचा सिनेमा म्हटल्यावर प्रेक्षकांना उत्सुकता असतेच कारण या सिनेमातून त्यांना काहीतरी वेगळा अनुभव दरवेळेस मिळत असतो,
नागराज मंजुळे यांनी आगामी चित्रपट बाबत सोशल मिडियात पोस्ट करून अपडेट्स दिली आहे
मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात ?
नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं.
पहिल्या “नाळ” प्रमाणेच
‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे !
“नाळ 2” नावानं चांगभलं !!!
नाळ प्रमाणेच ‘नाळ 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
दिग्दर्शक पा रंजित यांना ओटीटी प्ले पुरस्कार देऊन गौरव
Jai Bhim Movie जयभीम चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 01,2022, 11:55 AM
WebTitle – Important update regarding Nagaraj Manjule’s upcoming film