डेहराडून : केदारनाथ मंदिर पायी मार्गावरील डोंगर खचला त्यामुळे भीषण दुर्घटना घडली असून केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पायी मार्गावर अचानक भूस्खलन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाल्याचे समजते आहेत. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू असताना पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत.

केदारनाथ मंदिर पायी मार्गावरील डोंगर खचला, भीषण दुर्घटना ३ जणांचा मृत्यू
केदारनाथ मंदिराच्या पायी मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. केदारनाथ मंदिराकडे जाताना भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर इतर ८ जण जखमी झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन दलाने दिलेल्या माहितीनुसार, भाविक सकाळी गौरीकुंडवरून निघाले होते. चीडवासाजवळ भूस्खलन झाल्यामुळे तिघांनी जीव गमावला आहे.
महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू
या दुर्घटनेत किशोर अरुण पराटे (रा.नागपूर), सुनील महादेव काळे (महाराष्ट्र) , अनुराग बिश्त (उत्तर प्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे समोर आली आहेत. किशोर सोबत निखिल निब्माजी नावाचा तरुण आहे. केदारनाथ मंदिराकडे पायी जात असताना चीरबासा जवळ ही घटना घडली. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीतीही व्यक्त केली जातेय.
चारधाम यात्रेसाठी रविवारी सकाळी श्रद्धाळु भाविक केदारनाथ मंदिराकडे निघाले होते. यावेळी पायी मार्गावर चिरबाटियाजवळ भीषण दुर्घटना घडली. अचानक पर्वत हादरल्यासारखं झालं आणि काही क्षणातच माती आणि दगडाचा ढिगारा अंगावर आला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी सुरक्षा दलाकडून बचावकार्य राबवलं जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
बचावकार्य सुरू असताना तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पावसाळ्यात उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागात भूस्खलनाच्या घटना घडतात.
काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यानं वाहतूक ठप्प झाली होती.
१० मे पासून चार धाम यात्रा सुरु झाली आहे
केदारनाथ मंदिर या वर्षी १० मे रोजी सुरू झालेल्या चार धाम यात्रेचा एक भाग आहे.
चार धाम यात्रा, ज्यामध्ये भक्त गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथला देखील भेट देतात, हिंदू धर्मात खूप महत्त्वाची आहे
आणि सहसा एप्रिल-मे ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होते.चार धाम यात्रा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण करावी असे मानले जाते.
तीर्थयात्रा यमुनोत्रीपासून सुरू होते, गंगोत्रीकडे जाते, केदारनाथला जाते आणि शेवटी बद्रीनाथ येथे संपते.
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा
येत्या ४८ तासांत उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. कुमाऊं क्षेत्रासाठी रेड अलर्ट तर गढवाल भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २१ जुलै रोजी चंपावत, नैनिताल आणि उधम सिंह नगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पौरी, पिथौरागढ, बागेश्वर आणि अल्मोडा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय डेहराडूनसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 21,2024 | 18:20 PM
WebTitle – Kedarnath temple footpath mountain collapse, terrible accident 3 dead