पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयामध्ये सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केल्याचा खटला प्रकरणाची सुनावणी अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या या बदनामी खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या समोर सुरू आहे. या कायदेशीर प्रक्रियेत सध्या फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलट तपास घेतला जात असून, राहुल गांधी यांची बाजू ज्येष्ठ वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार मांडत आहेत.
या उलट तपासा दरम्यान अनेक ऐतिहासिक आणि वैचारिक संदर्भांवरून न्यायालयात सविस्तर चर्चा झाली. राहुल गांधी बदनामी खटला प्रकरणातील फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी उलट तपासावेळी काही महत्त्वाच्या बाबी मान्य केल्या. यामध्ये प्रामुख्याने, विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधी यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे गेले होते, ही बाब त्यांनी स्वीकारली. मात्र, त्या खटल्यातून सावरकरांची नंतर निर्दोष मुक्तता झाली होती, असेही त्यांनी नमूद केले. यासोबतच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तत्कालीन ब्रिटीश सरकारकडे पाच वेळा दया याचना अर्ज केले होते, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती देखील सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मान्य केली आहे.
गाय ही देवता नसून तो एक उपयुक्त पशू – सावरकर
राहुल गांधी यांच्याविरोधात सावरकरांची बदनामी केल्याच्या संदर्भातील खटला प्रक्रियेत
सावरकरांच्या विचारसरणीवर आधारित अनेक प्रश्न ॲड. मिलिंद पवार यांनी उपस्थित केले.
यामध्ये द्विराष्ट्रवाद आणि गायीबद्दलचे सावरकरांचे विचार यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले.
गाय ही देवता नसून तो एक उपयुक्त पशू आहे, असे सावरकरांनी म्हटले होते का?
यावर विचारणा केली असता सात्यकी सावरकर यांनी त्यास दुजोरा दिला.
तसेच, वैचारिक पातळीवर सावरकरांवर होणाऱ्या टीकेचे संदर्भही न्यायालयात देण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी गांधी ही श्रद्धा तर सावरकर ही अंधश्रद्धा अशा शब्दांत केलेली टीका,
तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर की स्वातंत्र्यविरोधी सावरकर अशा प्रकारच्या विधानांचा उल्लेख उलट तपासात करण्यात आला.
या सुनावणीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या सावरकरांवरील टीकेचा संदर्भही समोर आला.
सावरकर हे ब्रिटीशांसाठी सैन्य भरतीचे काम करत होते, असा दावा द्वादशीवार यांनी केला होता,
याकडे सात्यकी सावरकर यांचे लक्ष वेधण्यात आले.
तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सावरकरांनी ब्रिटीशांची चाकरी केली,
अशी केलेली टीका आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी त्यांच्या पुस्तकात सरदार पटेल
यांच्या विरोधात सावरकरांनी घेतलेल्या भूमिकेचा केलेला उल्लेख,
याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसल्याचे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयाला सांगितले.
सावरकर कुटुंबीयांनी स्वतः कधीही भारतरत्न देण्याची मागणी अधिकृतपणे केलेली नाही
या खटल्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सावरकरांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या
केवळ राहुल गांधी यांच्यावरच ही कायदेशीर कारवाई का करण्यात आली?
यावर फिर्यादींनी मान्य केले की, राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त त्यांनी इतर कोणावरही अशा प्रकारची कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केलेली नाही.
तसेच सावरकर कुटुंबीयांनी स्वतः कधीही विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी अधिकृतपणे केलेली नाही,
असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, इतर संघटना अशा प्रकारची मागणी करत असतील तर त्याबाबत आपल्याला माहिती नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढ्यातील इतर क्रांतिकारकांचा उल्लेख करताना सात्यकी सावरकर यांनी मान्य केले की, भगतसिंग, अशफाक उल्ला खान, उधमसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांसारख्या क्रांतीकारकांचे योगदानही तितकेच मोठे आहे. संसदेत सावरकरांचे तैलचित्र असणे हा राष्ट्रीय गौरव असला तरी, इतर क्रांतीकारकांना तशा प्रकारचा गौरव का मिळाला नाही, यावर त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. जेव्हा ॲड. मिलिंद पवार यांनी विचारले की, स्वातंत्र्यलढ्यात फाशी जाणे आणि शिक्षेत सवलत मिळवणे यात काही नैतिक फरक आहे का? तेव्हा सात्यकी सावरकर यांनी उत्तर दिले की, कोणाला सवलत द्यायची हा निर्णय ब्रिटीश सरकारचा होता, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
या कायदेशीर लढाईत राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्यासह ॲड. ज्ञानेश्वरी भानुदास जाधव, ॲड. अजिंक्य भालगरे आणि ॲड. सुयोग गायकवाड हे सहकार्य करत आहेत. वेळेअभावी हा उलट तपास पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात सावरकर यांची तथाकथित बदनामी संदर्भातील खटला प्रकरणाची पुढील सुनावणी आता २५ मे २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. या खटल्याच्या निकालाकडे आणि पुढील उलट तपासाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 03,2026 | 22:00 PM
WebTitle – rahul-gandhi-savarkar-defamation-case-pune-satyaki-savarkar-cross-examination-updates





















































