सोलापूर 07-07-2026 : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौंडेश्वरवाडी येथे शेतात काम करत असलेल्या एका महिलेवर अज्ञात कारणातून गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिलेचे नाव उषा विजय साठे असे असून, त्या नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, सचिन देशमुख नावाचा एक व्यक्ती घटनास्थळी आला आणि त्याने उषा साठे यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या उषा साठे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृत महिला या दलित समाजातील असल्याची माहिती समोर येत असून यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद,
जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिवसाढवळ्या शेतात घडलेल्या या हत्येमुळे चौंडेश्वरवाडीसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके कार्यरत असून, या प्रकरणातील पुढील तपास अकलूज पोलीस करत आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 07,2026 | 19:50 PM
WebTitle – Woman Shot Dead While Working In Farm In Solapur’s Malshiras, Police Launch Investigation























































