मुंबई ३०/०६/२०२६ | मुंबईत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेला महामोर्चा आपल्या नावाप्रमाणेच महामोर्चा ठरला. हा केवळ एक मोर्चा नव्हता, तर ती ५९ जातींची वज्रमूठ होती. या मोर्चाच्या निमित्ताने मुंबईच्या रस्त्यांवर जनसागराचा महापूर लोटला होता. नजर जाईल तिथपर्यंत फक्त माणसेच माणसे दिसत होती. या महामोर्चा साठी राज्यभरातून ५९ जातींचे प्रतिनिधी आणि लाखो सामान्य लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे, मोर्चा सुरू असताना पावसाचा जोर प्रचंड होता, मात्र उपस्थितांनी कशाचीही तमा न बाळगता, एकही छत्री न उघडता, आपल्या मागण्यांसाठी ठामपणे पावसाच्या सरी झेलत आंदोलनात सहभाग नोंदवला. या प्रसंगाची तीव्रता आणि लोकांचा संयम फोटोंमध्येही स्पष्टपणे दिसून येत होता.
या महामोर्चा चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा मोर्चा कोणत्याही जातीच्या विरोधात नव्हता. प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणातून ही भूमिका स्पष्टपणे मांडली. संपूर्ण आंदोलनादरम्यान कोणीही कोणाचे मन दुखावणारे विधान केले नाही. उलट, अत्यंत संयमी आणि प्रगल्भ भाषेचा वापर करत आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. कोणत्याही जातीची बदनामी करणे, खोटे आरोप करणे किंवा हातात चपला घेऊन उथळ कृती करून आरएसएसचा अजेंडा राबवणाऱ्या लोकांवर चिखलफेक करणे, अशा प्रकारची कोणतीही फालतू कृती या आंदोलनात झाली नाही. याउलट, हा लढा अत्यंत वैचारिक पातळीवर लढला गेला.
महामोर्चाचे नेतृत्व करणारे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, आम्ही संवादी आहोत. आम्ही संवाद बंद केलेला नाही, आमची दारे उघडी आहेत आणि भविष्यातही उघडी असतील. त्यांनी सरकारला इशारा देताना म्हटले की, एकदा जनगणना होऊ द्यात, आम्ही १३ टक्के आरक्षण मोडू देणार नाही. उलट जनगणनेनंतर आम्हाला २० टक्के आरक्षण वाढवून हवे आहे. जे आरक्षण आहे ते टिकवून वाढवण्यावर आमचा भर आहे, तोडण्यावर नाही. महाराष्ट्रात आम्ही हे उपवर्गीकरणाचे राजकारण घडू देणार नाही. देवेंद्र फडणवीस यांची हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही. भीमराव आंबेडकर यांनी कडक शब्दात बजावले की, आज देवेंद्र फडणवीस यांना झोप लागणार नाही, कारण माझ्या विरुद्ध एवढी मोठी ताकद उभी राहिली आहे. त्यांनी माइनॉरिटीला दाबलं, त्यांना वाटलं आम्हालाही दाबता येईल, पण आम्ही आंबेडकरवादी आहोत. आम्हाला फुटबॉल चांगल्या प्रकारे खेळता येतो, गोल कसा मारायचा हे आम्हाला ठाऊक आहे, त्यामुळे आता आम्ही गोलवर गोल मारू, असा इशारा त्यांनी दिला.
महामोर्चा च्या दरम्यान जनसमुदायाला संबोधित करणाऱ्या जवळपास सर्वच वक्त्यांचा रोख हा राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. या महामोर्चाचे नेतृत्व करणारे दुसरे नेते आनंदराज आंबेडकर आणि शिष्टमंडळाची मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मोर्चातील जनसमुदायाला संबोधित करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, आज सर्वच नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही आपल्या सोबत असल्याचे सांगत आहेत. उद्या किंवा परवा यासंदर्भात पुन्हा बैठक होणार आहे. माझ्या मते, आपण अर्धी लढाई आधीच जिंकली आहे. सरकार आश्वासन देत आहे, मात्र आता आपल्याला जिल्हास्तरावरही आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे. या ५९ जाती आता शांत बसणार नाहीत. आम्ही सर्व समाजाला एकच आवाहन केले आहे की, या ५८ ते ५९ जातींना एकमेकांच्या विरोधात उभे करू नका. उपवर्गीकरण लागू होऊ नये, यासाठी आमचा लढा सुरूच राहील.
तेलंगणामधून आलेले माला जातीचे मेजर मोर्चात सामील झाले होते. त्यांनी जमेल तशा मराठीत आपले छोटे पण प्रभावी भाषण केले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत. दोघेही दलित विरोधी असून उपवर्गीकरणाचा अजेंडा राबवत आहेत. हा अजेंडा आपण हाणून पाडला पाहिजे. आम्ही तेलंगणातून शेकडो लोक या मोर्चात आलो आहोत आणि आम्ही तुम्हाला पूर्ण ताकद देतो. आपण सर्वांनी मिळून आंबेडकर कुटुंबाला साथ देऊया आणि हा उपवर्गीकरणाचा अजेंडा हाणून पाडूया.
चर्मकार महासंघाचे गणेश बोरकर यांनी आक्रमक भूमिका मांडताना सांगितले की, ५९ जातींचा बाप एकच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ५९ जातींचे तुकडे करण्याचा जो घाट घातला जात आहे, तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. माझ्या बापाच्या विचारांच्या विरोधात कोणी जात असेल, तर त्याचे दोन तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तसेच, संजय खामकर, अध्यक्ष चर्मकार महासंघ म्हणाले की, अनुसूचित जातीत फूट पाडण्याकरता आपल्या मातंग समाजातील काही बांधवांना सत्तेचे गाजर देऊन वेगळे काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, बाबासाहेबांनी सांगितले की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. आम्ही शिकलो आहोत, आम्ही त्यांची चाल ओळखली आहे. आम्ही आंबेडकरी बांधवांच्या सोबत आलो आहोत आणि आम्ही एक आहोत, हे आम्ही दाखवून दिले आहे. भविष्यात रक्त सांडायची वेळ आली, तर चर्मकार समाज सर्वात पुढे असेल.
ॲड. सुरेश माने यांनी सांगितले की, हा महामोर्चा कोणत्याही जाती विरोधात नाही, तर हा मोर्चा सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आहे.
या महामोर्चामध्ये चर्मकार, ढोर, मातंग, ककैय्या यासह विविध ५९ जातींचे प्रतिनिधी आणि सामान्य लोक उपस्थित होते.
तेलंगणा मधून आलेल्या १५० माला जातीचे प्रतिनिधी, मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी
आणि आगरी समाजाचे प्रतिनिधी राजाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विधानसभेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली की, या मोर्चाची एकूण संख्या सुमारे ५ लाख होती.
मुंबईत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात काढलेल्या या मोठ्या मोर्चात ५ लाखांच्या संख्येने सर्व जातीय समाजबांधव सहभागी झाले होते.
सर्वांची एकच मागणी होती की, जोपर्यंत न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केला जात नाही
आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केली जात नाही, तोपर्यंत सरकार कोणत्याही प्रकारचे विधेयक आणू नये.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली.
त्यांनी सांगितले की, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
उपवर्गीकरणाची संकल्पना ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून समोर आली असून,राज्य सरकार केवळ त्यासंदर्भात तांत्रिक प्रक्रिया राबवत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला असून त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.
या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
संपादकीय टीप: या संपूर्ण आंदोलनातून एक गोष्ट स्पष्ट होते की,
अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा विषय हा केवळ आरक्षणाचा विषय नसून तो सामाजिक ऐक्याचा विषय बनला आहे.
५९ जातींचे हे एकत्रीकरण सरकारला भविष्यातील निर्णयांबाबत अधिक सावध राहण्यास भाग पाडेल, हे नक्की.
एकूणच मुंबईच्या भरपावसात लाखोंचा हा मोर्चा यशस्वी केल्याबद्दल सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 आंबेडकरवादी घटकांचे मन:पूर्वक अभिनंदन
हा महामोर्चा उपवर्गीकरणाच्या विरोधात ५९ जातींच्या एकीचे प्रतीक ठरला असून, तो भविष्यातील संघर्षाचा एक भक्कम पाया मानला जात आहे.

Milind Dhumale
Editor and political–social affairs analyst with a sharp focus on constitutional values, social justice, and power structures in contemporary India. His writing examines caste, governance, law, and public policy through a fact-based, critical lens, aiming to challenge dominant narratives and highlight voices often pushed to the margins. Known for clarity, depth, and editorial rigor, he brings analytical precision to issues that shape democracy and social equity.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 30,2026 | 23:00 PM
WebTitle – sc-sub-categorization-protest-mumbai-mega-rally























































