जयसिंगपूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सावळा मास्तर स्मृती प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व युवा विचारमंच, गोठणेगाव वसाहत (दानोळी, ता. शिरोळ) यांच्या वतीने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार येथे विविध सामाजिक उपक्रमांसह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करणारे, डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीत सक्रिय भूमिका बजावणारे तसेच श्रमिक मुक्ती दलाचे राज्य उपाध्यक्ष मारुती राजाराम पाटील यांना ‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा व समाजसेवा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

‘राजर्षी शाहू सामाजिक सलोखा व समाजसेवा पुरस्कार’ प्रदान
मारुती पाटील हे कुणबी-मराठा समाजातील असून बौद्ध, दलित आणि वंचित समाजाशी समतेचे
आणि सौहार्दपूर्ण संबंध जोपासत सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर दीपकभाई गोठणेकर होते. त्यांच्या हस्ते मारुती पाटील यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष दाऊद पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष विजय गोठणेकर,
बाबू झोरे, प्रकाश झोरे, बाबाराम कांबळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मारुती पाटील म्हणाले, “राजर्षी शाहू महाराजांचा समतावादी आणि कृतीशील विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. या पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी अधिक वाढली असून, पुढील कार्यासाठी नवे बळ आणि प्रेरणा मिळाली आहे.” त्यांनी यावेळी आयोजक संस्थेबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.

जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत बौद्ध आणि मुस्लिम समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात शाहीर दीपकभाई गोठणेकर यांनी राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध,
शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेली शैक्षणिक मदत, कोल्हापूर संस्थानात राबवलेले आरक्षण धोरण,
सामाजिक समतेची भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यावर सविस्तर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन बोधिसत्व युवा विचारमंचाचे उपाध्यक्ष रणधीर कांबळे यांनी केले.
प्रास्ताविक सुनील कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन अजय कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश कांबळे, निलेश कांबळे, सचिन कांबळे, संदेश कांबळे, प्रशिक कांबळे आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 02,2026 | 07:00 AM
WebTitle – rajarshi-shahu-maharaj-jayanti-rajarshi-shahu-samajik-salokha-samajseva-award























































