केओंझार (ओडिशा) : Odisha man carries sister skeleton to bank case म्हणून समोर आलेल्या या अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. केओंझार जिल्ह्यातील डायनाली गावातील जितू मुंडा या व्यक्तीने आपल्या मृत बहिणीच्या खात्यातील १९,३०० रुपये काढण्यासाठी थेट बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जाण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, जितू मुंडा हे एका आदिवासी कुटुंबातील असून ते अत्यंत गरीब आणि अशिक्षित आहेत.त्यांची बहीण काकरा मुंडा हिचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. तिचा पती आणि एकुलता एक मुलगा यांचा मृत्यू यापूर्वीच झाला होता. त्यामुळे जितू हेच बहिणीचे एकमेव जिवंत नातेवाईक उरले होते.काकरा मुंडा यांचे ओडिशा ग्रामीण बँकेच्या मल्लिपासी शाखेत खाते होते, ज्यामध्ये १९,३०० रुपये शिल्लक होते.जितू यांनी बँकेत जाऊन हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँक व्यवस्थापकांनी त्याला नकार दिला.
खातेदार स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे किंवा कायदेशीर वारस असल्याचे अधिकृत कागदपत्र सादर करावे लागेल,
अशी अट त्याच्यासमोर ठेवण्यात आली.
ओडिशा मधील हृदयद्रावक घटना: बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन ३ किमी चालत बँकेत पोहोचला भाऊ
अशिक्षित आणि गरिबीशी झुंजणाऱ्या जितू यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र किंवा वारसत्वाचे कागदपत्र नव्हते.
बँकेची प्रक्रिया त्याना समजली नाही आणि टे निराश होऊन परतले.
यानंतर सोमवारी जितू यांनी अत्यंत वेदनादायक पाऊल उचलले.ते गावातील स्मशानभूमीत गेले,
त्यांनी बहिणीचे अवशेष जमिनीतून बाहेर काढले, ते कापडात गुंडाळले आणि उन्हाच्या कडाक्यात सुमारे ३ किलोमीटर अंतर चालत ते बँकेत पोहोचले.
Odisha Man Digs Up Sister's Skeleton as Proof to Claim the Money in Her Account pic.twitter.com/1xzUKmerlC
— TIMES NOW (@TimesNow) April 28, 2026
बँकेसमोर उभा राहून त्यांनी बहिणीचा सांगाडा दाखवत पैसे देण्याची मागणी केली. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिक स्तब्ध झाले. काहींच्या डोळ्यात अश्रू आले, तर काहींनी संताप व्यक्त केला. गावकऱ्यांनी बँकेवर असंवेदनशीलतेचा आरोप केला. “एका गरीब माणसाला त्याचेच पैसे मिळवण्यासाठी इतका त्रास सहन करावा लागतो का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
स्थानिकांच्या मते, बँक प्रशासनाने गावच्या सरपंचाकडून पडताळणी करू शकली असती
किंवा प्रत्यक्ष पाहणी करून सत्यता तपासू शकली असती.
मात्र, कागदोपत्री प्रक्रियेला अधिक महत्त्व देण्यात आले आणि मानवी संवेदना बाजूला पडल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जितू यांना समजावून सांगितले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची मानवी दृष्टीकोनातून हाताळणी केली जाईल आणि बँकेकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
Odisha man carries sister skeleton to bank case हे प्रकरण देशातील ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग प्रणालीशी सामना करताना येणाऱ्या अडचणी अधोरेखित करते. तज्ज्ञांच्या मते, आर्थिक समावेशनाच्या दृष्टीने योजनांची अंमलबजावणी होत असली तरी प्रत्यक्षात अशिक्षित आणि वंचित घटकांसाठी प्रक्रिया अजूनही क्लिष्ट आणि कठीण आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या वेदनेची कथा नसून, व्यवस्थेतील त्रुटी, कागदोपत्री अडथळे
आणि मानवी संवेदनांचा अभाव यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
सध्या या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागले असून, प्रशासन आणि बँक यंत्रणा या घटनेतून काही धडा घेतात का
आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 29,2026 | 15:08 PM
WebTitle – Odisha Man Carries Sister Skeleton to Bank for Rs 19300 Balance Keonjhar Shocking Incident























































