महाराष्ट्र: पत्रकार गौरी लंकेश यांच्या 2017 मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपी पैकी एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाला आहे.2018 मध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटात कथित सहभागासाठी अटक करण्यात आलेले आरोपी श्रीकांत पांगारकर शुक्रवारी (19 ऑक्टोबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत सामील झाले.
जालना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी
इंडियन एक्सप्रेस च्या बातमीनुसार, गेल्या महिन्यातच त्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
श्रीकांत पांगारकर 2001 ते 2006 या काळात जालना येथे अविभाजित शिवसेनेचे नगरसेवक होते.
त्यांनी 2011 मध्ये पक्ष सोडला आणि हिंदू जनजागृती समितीत सामील झाले.
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत श्रीकांत पांगारकर शिवसेनेत पुन्हा आले. यावेळी खोतकर म्हणाले, “श्रीकांत पांगारकर पूर्वी शिवसैनिक होते आणि पक्षात परत आले आहेत. त्यांना जालना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे… ते पक्षासाठी काम करत आहेत. त्यांना न्यायालयाने मुक्त केले आहे आणि न्यायालयीन कार्यवाहीनंतर ते तुरुंगातून बाहेर आले आहेत.”
श्रीकांत पांगारकर 2018 च्या नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही आरोपी आहेत,
यावेळी आरोप केला गेला होता की 2017 मध्ये आयोजित सनबर्न संगीत महोत्सवात विघ्न आणण्याचा कट रचला गेला होता.
कारण आरोप करणाऱ्यांना वाटले की हा महोत्सव हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे. या उद्दिष्टासाठी पिस्तुल, एअरगन आणि पेट्रोल बॉम्ब खरेदी करण्यात आले होते.
गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपी असलेले श्रीकांत पांगारकर वर शस्त्रास्त्रांची व्यवस्था करणे आणि प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचा आरोप आहे.
विरोध लक्षात घेऊन हा निर्णय बदलला
दरम्यान, श्रीकांत पांगारकर यांना पक्षात घेणे आणि निवडणूक प्रचाराची जबाबदारी देणे यामुळे सर्वत्र टीका होत आहे. द टेलीग्राफनुसार, शिवसेनेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जर श्रीकांत पांगारकर यांना जालना जिल्ह्यात पक्षाचे कोणतेही पद देण्यात आले असेल तर तो निर्णय तातडीने स्थगित करण्यात येत आहे.
श्रीकांत यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर सातत्याने निदर्शने होत होती, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रविवारी जालन्यातील पक्षाने (जिल्हा स्तरावरील) काढलेले सर्व आदेश अवैध असल्याचे पत्र जारी केले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेला विरोध लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
अलीकडेच, कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर हिंदुत्ववादी गटांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते.
त्यांच्या तीक्ष्ण लेखनशैलीमुळे आणि धाडसी विचारांमुळे कर्नाटकमधील वाचकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या गौरी लंकेश या पत्रकार आणि संपादक यांची 5 सप्टेंबर, 2017 रोजी रात्री उशिरा बेंगळुरू येथील त्यांच्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
त्या साप्ताहिक ‘लंकेश पत्रिका’ या पत्रिकेच्या संपादक होत्या. ही पत्रिका सत्ताधाऱ्यांविरोधी पत्रिकेच्या रूपात ओळखली जात होती.
गौरी लंकेश या कर्नाटकमध्ये संघ परिवाराच्या धार्मिक राजकारणाच्या विरोधात असलेल्या विचारांमुळे नेहमीच निशाण्यावर होत्या.
असे बोलले जाते की,त्यांच्या हत्येच्या आरोपपत्रात म्हटले होते की ही हत्या एक ‘संगठित गुन्हा’ होता,
ज्याचे आयोजन अतिरेकी दक्षिणपंथी हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेशी संबंधित लोकांनी केले होते.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 20,2024 | 22:21 PM
WebTitle – Gauri Lankesh Murder Accused Joins Shinde’s Shiv Sena After Bail