नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन मुद्यावर वाद सुरूच असून.विरोधकांनी हा राजकीय मुद्दा बनवला आहे. Congress काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप) AAP यांच्यासह बहुतांश विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या सर्वच पक्षांचा सूर सारखा नाही.त्यात बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) BSP सुप्रीमो मायावती Mayawati यांचाही समावेश आहे.नव्या संसद भवनाच्या उद्घाटन वाद प्रकरणी आपली भूमिका इतर विरोधी पक्षांपेक्षा वेगळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यूपीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हा बहिष्कार अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती च्या हस्ते का करत नाहीत?
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन मुद्द्यावर वाद सुरू झाल्यावर मायावती यांनी केंद्र सरकारच्या बाजूने बोलणे याला खूप महत्त्व आहे.मायावती त्याच दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतात, ज्यांच्या नावाने विरोधक मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.संसदेच्या नवीन इमारतीचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन का होत नाही, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केला. केजरीवाल आणि इतर विरोधी नेते ज्या मुद्यावरून वातावरण तापवत आहेत,त्याच मुद्याची हवा मायावती यांनी काढून टाकली.
28 मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. यावर बहुतांश विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे, असे सर्व विरोधी पक्षांचे मत आहे.यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही नाव प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या यादीत आहे.
केजरीवाल यांनी ट्विटमध्ये विचारले आहे की, ‘प्रधानमंत्री नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती च्या हस्ते का करत नाहीत?’ काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आप यासह १९ विरोधी पक्षांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी या पक्षांची मागणी आहे.
देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाची संधी न दिल्याने मोदी सरकारने आदिवासींचा “अपमान” केल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे म्हणाले की, राष्ट्रपतींऐवजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणे हा लोकशाहीचा अपमान आहे.
“आपल्या महान राष्ट्राच्या लोकशाही आचारसंहिता आणि घटनात्मक मूल्यांचा निंदनीय अपमान.” 19 विरोधी पक्षांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पूर्णपणे बाजूला सारून नवीन संसद भवनाचे उद्घाटन स्वतःहून करण्याचा प्रधानमंत्री मोदींचा हा निर्णय केवळ गंभीर अपमानच नाही तर आपल्या लोकशाहीवर थेट हल्ला आहे ज्याला योग्य प्रकारे तोंड देण्याची गरज आहे.” असं शिवाजीराव मोघे यांनी म्हटलंय.
मायावतींचे वेगळे मत…
मात्र, मायावतींचे मत यापेक्षा वेगळे आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे अन्यायकारक असल्याचे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या. 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने शुभेच्छाही दिल्या. मात्र, पूर्वनियोजित व्यस्ततेमुळे त्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहू शकणार नसल्याचेही मायावती यांनी सांगितले.
या विषयावर आपली भूमिका इतर विरोधी पक्षांपेक्षा वेगळी असल्याचे बसपा प्रमुखांनी स्पष्ट केले. एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या,
‘केंद्रात आधी काँग्रेस पक्षाचे सरकार असो किंवा आता भाजपचे, बसपने नेहमीच पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन देश आणि जनहिताच्या मुद्द्यांवर त्यांना पाठिंबा दिला आहे. हाच संदर्भ लक्षात घेऊन 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे आमचा पक्ष स्वागत करतो.
विरोधकांची भूमिका चुकीची
मायावती यांनी विरोधी पक्षांची भूमिका चुकीची असल्याचे स्पष्ट केले.
विरोधी पक्षांचा कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नव्या संसदेचे उद्घाटन न केल्याने बहिष्कार अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटलंय.
सरकारने ते बनवले आहे त्यामुळे त्यांना त्याचे उद्घाटन करण्याचा अधिकार आहे.असं त्यांनी म्हटलंय.
देशाला समर्पित कार्यक्रमाचे अर्थात नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रण मिळाले आहे,
ज्यासाठी मी आभार मानते आणि माझ्या शुभेच्छा देते. परंतु पक्षाच्या नियोजित आढावा बैठकांबाबत माझ्या पूर्वनियोजित व्यस्ततेमुळे
मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही.असं त्यांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यानीही केले समर्थन
नवीन संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते व्हावे, असा निर्णय एनडीए सरकारने घेतला आहे.
प्रधानमंत्री मोदींच्या प्रयत्नांमुळेच संसदेची ही नवी इमारत उभी राहिली आहे. विरोधकांनी यावर राजकारण करण्याची गरज नव्हती.
लोकशाहीत हे योग्य नाही. विरोधकांच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे,
असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
पुन्हा फ्रीज हत्याकांड; स्टोनकटरने केले तुकडे,श्रद्धा वालकर हत्याकांडसारखी घटना
त्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 26, MAY 2023, 11:05 AM
WebTitle –New Parliament Inauguration Debate; Mayawati’s tone is different from her opponents