भोपाळ: मध्य प्रदेशात नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पहिला आदेश मोठ्या आवाजाच्या नियंत्रणाबाबतच दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर डीजे आणि लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्यभरातील शेकडो डीजे चालकांवर कारवाईही झाली.नुकत्याच झालेल्या नवरात्र उत्सवात 90 पेक्षा जास्त डीजे चालकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.मात्र,भोपाळमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नाचणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
अचानक वाढलेल्या आवाजाने बेशुद्ध पडला लहानगा
दरम्यान, एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भोपाळमध्ये डीजे च्या मोठ्या आवाजामुळे विसर्जन मिरवणुकीत नाचणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळची असल्याचे सांगितले जात आहे, परंतु हे प्रकरण आता पोलिसांकडे आल्यानंतर उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 13 वर्षांचा समर बिल्लौरे पाचवी वर्गात शिकत होता.तो दुर्गा देवी मूर्तींच्या विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीत डीजेवर नाचत होता. याच वेळी डीजेवाल्याने साउंड अचानक वाढवले, ज्यामुळे समर जागेवरच बेशुद्ध पडला.
आईच्या विनंती नंतरही डीजेवाल्याने आवाज कमी केला नाही
मुलाची आई मदतीसाठी ओरडत राहिली, विनंती करत राहिली पण डीजे वाल्याने ऐकले नाही. कुटुंबीय मुलाला घेऊन एका खासगी रुग्णालयात गेले, परंतु तिथे त्याचा मृत्यू झाला. मुलाची आई जमुना देवीने सांगितले की, घटना सोमवारी रात्री 8 वाजताची आहे. मिरवणूक दूर असताना डीजेचा आवाज कमी होता, परंतु आमच्या भागात आल्यावर डीजेवाल्याने साउंड वाढवले.यादरम्यान समर नाचता नाचता बेशुद्ध पडला.
इतका डेसिबल आवाज बेकायदेशीर आहे
सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी आवाजाच्या तीव्रतेची मर्यादा निश्चित केली आहे.
औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करू शकत नाहीत, तर रात्रीसाठी ही मर्यादा 70 डेसिबल आहे.
व्यावसायिक क्षेत्रात दिवसा 65 आणि रात्री 55 डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.
निवासी क्षेत्रात दिवसा 55 आणि रात्री 45, तर शांत क्षेत्रात दिवसा 50 आणि रात्री 40 डेसिबलपेक्षा जास्त आवाज मर्यादा नसेल.
इथे करू शकता तक्रार
अशा समस्यांशी सामना करण्यासाठी आणि त्वरित उपाययोजना करण्यासाठी भोपाळ जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक 07552730395 जारी केला आहे. येथे नागरिक मोठ्या आवाजाबद्दल तक्रार नोंदवू शकतात.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 18,2024 | 19:06 PM
WebTitle – 13-Year-Old Boy Dies Due to Loud DJ Music in Bhopal