
खलिस्तानीवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्या कटाबाबत अमेरिकेने ज्याला वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे, तो कथित माजी भारतीय अधिकारी विकास यादव आहे. त्याला दोन महिने अगोदर दिल्ली पोलिसांनी गँगस्टर लॉरेंस बिश्नोई च्या नावाने खंडणी वसुली प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मार्च 2024 मध्ये चार्जशीट दाखल केली होती. मात्र, एप्रिल 2024 मध्ये विकास यादवला जामीन मिळाला होता. अमेरिकन एजन्सींनी भारत सरकारच्या माजी अधिकारी विकास यादववर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील राजकीय भेटीच्या आसपास, सिख विभाजनवादी गुरपतवंत सिंह पन्नूची हत्या करण्याच्या कथित अपयशी कटात सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
विकास यादवला खलिस्तानीवादी आणि अमेरिकन नागरिक गुरपतवंत सिंह पन्नूची हत्या करण्याच्या कटात कथित सहभागाबद्दल एफबीआय शोधत आहे. त्याचवेळी बातमी आली की विकासला गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेच्या विशेष सेलने खंडणीच्या आरोपाखाली अटक केली होती. काही महिने तिहार जेलमध्ये घालवल्यानंतर, सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
पोलिस अधिकाऱ्यांना यादवच्या वॉन्टेड असण्याची माहिती वृत्तपत्रांमधून मिळाली
हिंदुस्तान टाइम्स ने दिलेल्या बातमीनुसार,खंडणी वसुली प्रकरणाच्या तपासातून उघड झाले आहे की यादवने तक्रारदार राजकुमार वालिया यांच्याशी एका अंडरकव्हर एजंट म्हणून भेट घेतली होती. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की तो राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) साठी काम करणारा एक सरकारी अधिकारी असल्याचे भासवत होता. यादवने एनआयए कार्यालयाबाहेर त्याचे अपहरण करण्यापूर्वी त्याच्याशी भेट घेतली होती आणि त्याच्याकडून पैसे वसूल केले होते.
पोलिस अधिकाऱ्यांना यादवच्या वॉन्टेड असण्याची माहिती वृत्तपत्रांमधून मिळाली. सूत्रांनी असे सूचित केले की यादव गेल्या वर्षी एका पार्टीमध्ये एका मित्राच्या ओळखीने वालिया यांना भेटला होता. रोहिणी येथील व्यापारी वालियाने डिसेंबर 2023 मध्ये पोलिसांकडे तक्रार केली की त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने नोव्हेंबर 2023 मध्ये यादवची ओळख करून दिली होती. त्या व्यक्तीने वालियाला सांगितले होते की यादव एक वरिष्ठ सरकारी अधिकारी आहे.
एफआयआरमध्ये काय म्हटले आहे?
एफआयआरनुसार, विकास यादवने रोहिणी येथील रहिवासी वालिया यांची भेट घेतली,
वालिया हे पश्चिम दिल्लीच्या मोती नगरमध्ये एक कॅफे आणि लाउंज चालवतात.
यादवने अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीसोबत मिळून त्याला गंभीर धोका असल्याचे सांगितले.
आणि 11 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीतील एनआयए कार्यालयाजवळ भेटायला बोलवले.
एफआयआरमध्ये कोर्टाच्या आदेशाचा संदर्भ देत असं म्हटलंय की, “तक्रारदार त्याचा मित्र अभिजितसोबत विकास यादव ला भेटायला गेला होता, त्यावेळी दूसरा आरोपी अब्दुल्लाही त्याच्यासोबत उपस्थित होता. आरोपीने वालियाला गाडीमध्ये ढकललं आणि त्याला मारहाण करून लॉरेंस बिश्नोई च्या नावाने खंडणी मागितली. त्याच्यावर इंजेक्शन लावून त्याला धमकावले. आरोपींनी त्याच्या कॅफेमधून बँक चेक बुक घेतले आणि रिकाम्या चेकवर त्याचे स्वाक्षरी घेतल्या. त्यानंतर त्याला कारजवळ सोडून देण्यापूर्वी त्याला गप्प राहण्याची धमकी दिली गेली.”
एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे की,आरोपींनी वालियाच्या कॅफेमधील 50,000 रुपयेही चोरले होते.
तसेच सर्व सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सुद्धा डिलीट केले होते. पोलिसांना दिलेल्या कबुलीत यादवने सांगितले की,
त्याचे वडील सीमा सुरक्षा दलात (BSF) होते आणि 2007 मध्ये त्यांचे निधन झाले. 2015 मध्ये त्याचे लग्न झाले होते.
एफबीआय विकास यादवबद्दल काय म्हणते?
अमेरिकेच्या फेडरल अभियोजकांनी न्यूयॉर्कस्थित अमेरिकन न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की विकास यादव (39) कॅबिनेट सचिवालयात कार्यरत होता, जिथे भारताची परदेशी गुप्तचर सेवा रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) स्थित आहे. यादववर पन्नूच्या हत्येच्या अपयशी कटात सहभागी होण्यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांचा वापर करून हत्या करण्याचा प्रयत्न आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
न्याय विभागाने सांगितले की यादव अजूनही फरार आहे. पहिल्या खटल्यात यादवला CC 1 (सह-साजिशकर्ता) म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
भारत सरकारचा हा माजी कर्मचारी असल्याची पुष्टी भारतातील परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गुरुवारी केली होती.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 19,2024 | 14:34 PM
WebTitle – Vikash Yadav: Wanted by the U.S., Arrested by Delhi Police for Extortion in Lawrence Bishnoi’s Name