भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील अनुसया मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात स्टॉल लावून विविध संस्था आणि इतर इष्टार्थींनी दरवर्षी विविध सेवा व सुविधा पुरविल्या जातात. तसेच समाज बोधपर ग्रंथसाहित्य व इतर साहित्याची विक्री देखील होते. ह्या वर्षी उपरोक्त कार्यक्रमानुसार विविध स्टॉल्स वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र यामुळे आंबेडकरी समाजातून आता विरोधाचा सूर उमटू लागला आहे.विक्री होणाऱ्या वस्तू आणि त्यातून येणारे उत्पन्न यावर जीएसटी लावण्यास हरकत नाही आणि ते भरलेही जात आहे.मात्र या सुविधा आंबेडकरी समाजातील व्यक्ती,संस्थाच स्वखर्चाने सेवाभावी मानवतावादी दृष्टिकोण अर्थातच दानपारिमिता,धम्मदान, मेत्ता या तत्वानुसार देत असताना अशा मदतीच्या गोष्टीवरही जीएसटी लावून सरकार आडकाठी करत असल्याचा सूर उमटू लागला आहे.
विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील स्टॉल वाटपाबाबत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील अनुसया मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात स्टॉल लावून विविध संस्था आणि इतर इष्टार्थींनी दरवर्षी विविध सेवा व सुविधा पुरविल्या जातात. तसेच समाज बोधपर ग्रंथसाहित्य व इतर साहित्याची विक्री देखील होते. ह्या वर्षी उपरोक्त कार्यक्रमानुसार विविध स्टॉल्स वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार: स्टॉल्ससाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो कार्यक्रम दरवर्षी त्या ठिकाणी आयोजित केला जातो, त्यासाठी नोंदणी केली जाणार आहे. स्टॉल्ससाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १८-११-२०२४ पासून सुरु होणार असून, संबंधित अर्ज जमाबंदी जी/उत्तर विभागात सकाळी ११.०० ते दु. ८.३० दरम्यान स्विकारले जाणार आहेत.
अर्ज सादर करण्याची पद्धती व सूचना खालीलप्रमाणे आहेत:
१. स्टॉलधारकांनी आपले अर्ज आवक-जावक जी/उत्तर विभागात जमा करण्याची मुभा आहे. तेथून सदर अर्ज आवक-जावक विभागात स्वीकृत होईल.
२. आवक-जावक विभागात पत्त्यावर अर्ज स्वीकृत केले जाणार नाही. तसेच पोस्ट किंवा कुरिअरने आलेले अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत.
३. जाहिरातीत नमूद दिनांकानुसार फक्त दि. १८-११-२०२४ पर्यंत अर्ज स्वीकृत केले जातील.
४. अर्जदाराने स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी योग्य प्रमाणपत्र सादर करावे (पॅन कार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, निवडणूक कार्ड इ.)
५. अर्ज सादर करण्यासाठी वेळेत आलेली नोंदणी मान्य केली जाईल.
६. नोंदणीसाठी स्टॉल वाटप दि. २९-११-२०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता होईल.
७. सदर अर्जावर स्वाक्षरी नसलेली अर्ज स्वीकृत होणार नाहीत.
८. अर्जदार आपल्यासाठी स्टॉल मिळवण्यासाठी आवश्यक पावती आणणे बंधनकारक आहे.
वाटप करण्यात येणाऱ्या स्टॉलच्या वर्गवारी संख्ये व शुल्क खालीलप्रमाणे आहे:
अनु.क्र. | स्टॉलची वर्गवारी | स्टॉलचे शुल्क (+18% GST) | स्टॉलची संख्या |
---|---|---|---|
१ | मोफत पाणी वाटप | २५ + GST | २५ |
२ | मोफत अन्न वाटप | २५ + GST | ८० |
३ | कॅन्स्ट स्टॉल | १०० + GST | ५५ |
४ | मंडप | ७५० + GST | ३० |
५ | सामान्य स्टॉल | १०० + GST | ३०० |
एकूण: ४६९ स्टॉल्स उपलब्ध आहेत.
संपर्क पत्ता: मालमत्ता अधिकारी, खो.क्र. ४५, दुसरा मजला, जी/उत्तर विभाग कार्यालय, हरीसंदे वेटल मार्ग, लाज्या सिनेमा मागे, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८.
संपर्क क्रमांक: ६६५०३६०० / ९८०० / १९९९
आंबेडकरी समाजातून विरोधाचा सूर
प्रति,
मान.भूषण गगराणी साहेब
आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका
फोर्ट मुंबई ४००००१
विषय: 5 ते 6 डिसेंबर 2024 रोजी चैत्यभूमी दादर परिसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहण्यासाठी अनुयायी आणि सामान्य सार्वजनिक मेळाव्यात गरीब आणि गरजूंना मोफत अन्न, पाणी, आणि औषध देणाऱ्या इत्यादी साहित्याचे स्टॉलवरही 18% ‘GST’ लावण्यात आलेला रद्द करण्याबाबत
सदर्भ – पेपर जाहिरात सोबत जोडीत आहे.
महोदय,
तुमच्या निदर्शनास आणून देत आहे की M.C.G.M वर नमूद केलेल्या तारखांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना मोफत अन्न, पाणी आणि औषधांचे वाटप करणाऱ्या इत्यादी साहित्याचे स्टॉलवर 18% GST आकारत आहे.
वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये स्टॉल वाटपासाठी पाळण्यात येणाऱ्या नियम आणि प्रक्रियेचा तपशील स्पष्टपणे नमूद केला आहे.
भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर तेथील त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधांमध्ये येणाऱ्या विषयांमध्ये हे स्टॉल येतात. म्हणून आपणास विनंती करतो की असा कर आकारणी बरोबर नाही आणि समाजातील वंचित आणि गरजू वर्गाला मदत करण्यासाठी व पुढील जगण्याचा मार्गदर्शन घेऊन जाण्यासाठी विविध साहित्य तेथे उपलब्ध होते आणि त्यासाठी अशा पद्धतीने जीएसटी लावणे हे योग्य नाही. ६ डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेल्या समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाच्या मूल्यांना कृतज्ञता व्यक्त करत अभिवादन अर्पण करण्याचा दिवस आहे. आणि त्या दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त उभारले जाणारे स्टॉल मुळात सर्व संघटनेची मागणी आहे की हे महानगरपालिकेने स्वतः बांधून दिले पाहिजेत पण तसं होताना दिसत नाही उलट जीएसटी आकारणे हे कितपत योग्य आहे.
माझ्या विषयाचे गांभीर्यपूर्वक विचार करून मोफत अन्न, पाणी, औषध आणि अगदी पुस्तकांचे वाटप इतर कोणत्याही पद्धतीचे साहित्य विक्री करणाऱ्या स्टॉल्सवरील “GST” रद्द करून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सरकारच्या वतीने अभिवादन कराल याकरिता आपणास विनंती पत्र देत आहे या पत्राचा आपण लेखी स्वरूपात खुलासा द्याल ही नम्र विनंती.
आपला नम्र
कामगार नेते रमेश मारुती जाधव अध्यक्ष जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख बौद्धजन पंचायत समिती, चैत्यभूमी व्यवस्थापक
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 24,2024 | 08:36 AM
WebTitle – GST Now Mandatory for Food and Water Distribution Stalls on Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day