4 मोठे Flop IPO: अलीकडे आलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO, Hyundai Motor, गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद मिळवू शकला नाही. त्यामुळे, हा IPO इन्वेस्टर्सच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. इतकंच नव्हे, तर Hyundai चा IPO त्याच्या अपर प्राइस बँडच्या खाली लिस्ट झाला. पण हे पहिल्यांदाच झालं नाही. गेल्या 15-16 वर्षांमध्येही असे अनेक मोठे IPO आलेत, ज्यांनी लोकांना निराश केले.
1- रिलायन्स पॉवर IPO (2008)
लिस्टिंगनंतर रिटर्न: -9.81%
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचा IPO लिस्टिंगपूर्वी मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. 11,563 कोटींचा हा IPO तब्बल 73 पट सबस्क्राइब झाला होता. पण लिस्टिंग झाल्यावर गुंतवणूकदारांच्या अपेक्षा फोल ठरल्या. सध्या या शेअरची किंमत फक्त ₹40 आहे, आणि हाय लेव्हलपासून 82% ने कमी झाली आहे.
2- पेटीएम IPO (2021)
लिस्टिंगनंतर रिटर्न: -28.96%
पेटीएमचा IPO 2021 मध्ये आला आणि गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता होती. पण लिस्टिंगनंतर त्याने मोठा धक्का दिला. IPO प्राइस ₹2150 असताना शेअर ₹1950 ला लिस्ट झाला, आणि नंतर तो सतत पडत गेला. सध्या हा स्टॉक IPO प्राइसपेक्षा 60% ने कमी, ₹750 च्या आसपास आहे.
3- LIC IPO (2022)
लिस्टिंगनंतर रिटर्न: 7.92%
LIC चा IPO 2022 मध्ये लॉन्च झाला आणि बाजारात प्रचंड उत्साह होता. लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, परंतु अपेक्षित रिटर्न मिळाला नाही. IPO प्राइस ₹902-₹949 च्या दरम्यान होता, पण लिस्टिंग ₹867 वर झाली. सध्या हा स्टॉक देखील अपर प्राइस बँडपेक्षा खाली आहे.
4- Hyundai Motor India IPO (2024)
देशातील सर्वात मोठा IPO असलेल्या Hyundai Motor India च्या लिस्टिंगमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. ₹1960 च्या इश्यू प्राइसच्या तुलनेत शेअर ₹30 खाली लिस्ट झाला आणि नंतर ₹1807 वर पोहोचला. सध्या स्टॉक ₹1896 वर बंद झाला आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 23,2024 | 23:43 PM
WebTitle – Not Hyundai, these 4 IPOs in 16 years were also flops