गुजरात : फेक पोलिस, ऑनलाइन फसवणूक यासारख्या अनेक प्रकारच्या फसवणुकीबद्दल तुम्ही ऐकले असेल, पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की बनावट कोर्ट देखील चालवले जात आहे, तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही.मात्र, गुजरातच्या गांधीनगरमध्ये बनावट न्यायालय चालवले जात असल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. तुम्हाला अधिक आश्चर्य वाटेल की हे फेक कोर्ट एका प्रकरणासाठी नव्हे तर गेल्या पाच वर्षांपासून चालू होते.
पीटीआयच्या अहवालानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी गुजरातच्या गांधीनगरमधून एका अशा व्यक्तीला अटक केली आहे, ज्याने एक बनावट न्यायालय ट्रिब्युनल तयार केले आणि तिथं त्याने स्वतःला त्याचा न्यायाधीश बनवून तो न्यायदान सुद्धा करत आहे. अटक केलेल्या व्यक्तीने आपल्या ऑफिसचे वातावरण असे तयार केले की सर्वसामान्य माणसाला तिथे खरं कोर्ट असल्याचा अनुभव येईल. इथून त्याने बरेच बनावट आदेश सुद्धा जारी केले होते.
बनावट न्यायालय कामकाज किमान पाच वर्षांपासून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चन आहे. या व्यक्तीने 2019 मध्ये सरकारी जमिनीशी संबंधित एका प्रकरणात आपल्या एका क्लायंटच्या बाजूने आदेश दिला. पोलिसांचा विश्वास आहे की त्याच्या या फेक कोर्टाचे कामकाज किमान पाच वर्षांपासून चालू आहे.
गुजरात पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे की मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चन अशा लोकांना फसवत होता ज्यांचे जमीनविषयक प्रकरणे शहराच्या सिव्हिल कोर्टात प्रलंबित होती. पोलिसांनी सोमवारी सांगितले की तो आपल्या क्लायंट्सकडून या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एक विशिष्ट शुल्क घेत होता.
स्वतःला कोर्टाने नेमलेला मध्यस्थ म्हणून सांगत होता
अहवालानुसार, आरोपी मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चन लोकांसमोर स्वतःला कोर्टाने नेमलेला अधिकृत मध्यस्थ म्हणून सादर करत असे.
यानंतर तो आपल्या क्लायंट्सना गांधीनगर स्थित ऑफिसमध्ये बोलवायचा,
जे कोर्टासारखे दिसत होते आणि तिथे तो प्रिसाइडिंग ऑफिसर बनून फेवरटेबल आदेश देत असे.
पोलिसांच्या प्रेस रिलीजमध्ये सांगितले आहे की या तथाकथित कोर्टात मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चनचे साथीदार कर्मचारी किंवा वकील म्हणून उभे राहत होते,
ज्यामुळे त्याच्या क्लायंट्सना कार्यवाही खोटी नसल्याचा विश्वास बसायचा.
अहमदाबाद पोलिसांनी मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चनला कथितपणे एक आर्बिट्रल ट्रिब्युनलचा न्यायाधीश म्हणून सादर करून
आणि फेवरटेबल ऑर्डर जारी करून लोकांना फसवण्याच्या आरोपात अटक केली आहे.
सिव्हिल कोर्टाचे रजिस्ट्रार यांनी दिली तक्रार
पीटीआयच्या अहवालानुसार, शहराच्या सिव्हिल कोर्टाच्या रजिस्ट्रारांनी करंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली
आणि त्याच्या फेक कोर्टाचा भांडाफोड झाला.पोलिसांनी मॉरिस सॅम्युअल ख्रिश्चनविरुद्ध केस दाखल केली आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 23,2024 | 08:00 PM
WebTitle – Five-Year Fake Court Exposed: Gujarat Man Runs Fraudulent Tribunal, Deceiving Government and Public