तहान लागली म्हणून लहानगा दलित विद्यार्थी माठातून पाणी प्याला,म्हणून चिडलेल्या जातीयवादी शिक्षकाने अमानुषपणे मारहाण करत जीव घेतला,आपण देशभरात स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्षे पूर्ण झाली. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हटलं होतं की,
“२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्परविरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही.ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत, ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील.”
इथं दु:खद अंत:करणाने म्हणावं लागतं की 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी व्यक्त केलेले विचार आजही भारतीय समाजाला लागू आहेत. दुसरीकडे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली महाड येथे चवदार तळ्याच्या पाण्याला आग लावत मानव मुक्तीचा संगर घडवला होता.त्यालाही आता 95 वर्षे झाली,आणि आजही भारतात हिंदू समाजात पाण्याच्या मुद्यावरून जातीयवादी मानसिकता जोपासणारे लोक अगदी 21 व्या शतकात देखील आढळून येतात ही समाजासाठी लाज आणणारी गोष्ट नाही काय?
तहान लागली म्हणून माठातून पाणी प्याला जातीयवादी शिक्षकाने जीव घेतला
राजस्थानमधील जालोरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका मनुवादी शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या लहानग्या मुलाला एवढी अमानुष मारहाण केली की त्याचा त्यामुळे मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी जालोर जिल्ह्यातील सुराणा येथे मनुवादी शिक्षक छैल सिंह याने इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या इंद्र मेघवाल या विद्यार्थ्याला त्याने पिण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या माठाला शिवल्याने एवढी मारहाण केली की यात चिमुरडा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. मुलाला उपचारासाठी अहमदाबाद येथे दाखल करण्यात आले होते, तेथे उपचारादरम्यान आज 13 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
जालोर पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली
सदर घटनेच्या संदर्भात सायला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सीओ जालोरे तपास करत आहेत.
ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस अधीक्षक जालोरे व सीओ जालोरे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली.
आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून घटनास्थळी शांतता आहे.
लहानग्याचा जीव वाचवा म्हणून अनेक हॉस्पिटला भेटी दिल्या पण…
मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या अहवालात असे लिहिले आहे की, इंदर कुमारला तहान लागल्यावर
त्याने चुकून तथाकथित उच्च जातीयांच्यासाठी ठेवलेल्या दुसऱ्या मडक्यातील पाणी प्यायले,
त्यावर मनुवादी शिक्षक छैल सिंहने इंद्रला जातिवाचक शब्दाने हाक मारत त्याच क्रूरतेने अमानुषपणे मारहाण केली.
यामुळे त्याच्या उजव्या कानाला अंतर्गत दुखापत झाली.
कानात असह्य दुखत असल्याने दुकानात जाऊन मेडिकलमधून औषध घेतले पण त्याने फरक पडत नव्हता मग बजरंग हॉस्पिटल बजरंग, आस्था हॉस्पिटल भीनमाळ, त्रिवेणी हॉस्पिटल भीनमाळ, करणी हॉस्पिटल डीसा मेहसाणा, गीतांजली उदयपूर आणि सिव्हिल हॉस्पिटल अहमदाबादमध्ये सगळीकडे मुलाला घेऊन गेले,जास्त वेदना जाणवू लागल्याने मुलाचे पालक अनेक हॉस्पिटल फिरत राहिले.पण.. अखेर त्याची प्राणज्योत मालवली,तो वाचू शकला नाही.एवढी क्रूरता का भरलीय समाजामध्ये? याचा विचार करणार आहोत का? पाणी पाजणे पुण्याचे काम असं म्हटलं जातं म्हणे पण जातीयवादी मानसिकेपूढे तेही फिकं पडलं? अशा जातीयवादी मानसिकतेमुळे आणखी किती बळी जाणार आहेत?
मनुस्मृती सारखे ग्रंथ महिलांना खूप सन्माननीय स्थान देतात: न्या.प्रतिभा सिंह
हिंदू तरुणाला दाढी पाहून मारहाण; धर्म जाणून घेण्यासाठी अंतर्वस्त्रे काढली
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 13,2022, 23:20 PM
WebTitle – The casteist teacher brutally beat him to death after drinking water from a pot as he felt thirsty