मनुस्मृती सारखे ग्रंथ महिलांना खूप सन्माननीय स्थान देतात: न्या.प्रतिभा सिंह :
“शूद्र जातींचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी ‘मनुस्मृती’तील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे.” (बहिष्कृत भारत आणि मूकनायक : महाराष्ट्र शासन १९९०, पृ. १६३-१६७) भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक मधिल हे उद्धरण इथं अगत्याने द्यावे लागते.ते देत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची आहे.
मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927 रोजी करण्यात आलं.त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मातच “अजूनही” होते आणि तो धर्म सुधारण्याची अपेक्षा धरून होते.त्यामुळे वरील उद्धरणात नीटपणे वाचल्यास लक्षात येईल की बाबासाहेब म्हणतात, “‘मनुस्मृती’तील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे.”
हे स्पष्टीकरण देण्याचे आणखी एक कारण आहे.भोळ्या लोकाना आजकाल हिंदू खतरे में अशी बांग दिली की आपलं आणि आपल्या कुटुंबांच हित कशात आहे हे त्याला कळेनासे होते.किंबहुना कळायचे बंद होते.आणि तो धर्माच्या नावाखाली स्वत:चे नुकसान करायला सरसावतो.आता जर तुम्ही विशिष्ट धर्माचे असून तुमच्या विशिष्ट धर्माने अमुक तमुक नियम बनवून तुम्ही शिक्षण नोकरी इत्यादी गोष्टी नियम पाळून करायच्या किंबहुना करायच्या की नाही त्यावर निर्बंध असतील वगैरे असे काही असेल तर ते तुमच्यासाठी हिताचे आहे की नुकसान करणारे आहे? याचा एकदा आपण विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हि कृती आपल्याला नीटपणे समजते आणि आपलं हित साधणारा महामानव आपल्या देशात होऊन गेला याचा अभिमान देखील वाटून जातो. असो.
आजकाल देशातील न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्ती यांच्यावर सामान्य लोकानी टीका टिपण्णी करण्याचा मुद्दा नित्याचा झाला आहे.सोशल मिडियात तर त्यावर मिम्स सुद्धा बनवले जातात,मागे कुणी शरद बोबडे नावाचे कॉलेजियम प्रणालीतून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले होते,त्यावेळी ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी २९ जून रोजी एक ट्विट केले होते, ट्विटमध्ये सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांचा हर्ले डेव्हिडसन राइड करतानाचा फोटो पोस्ट केला होता आणि म्हटले होते “इकडे सीजेआय राजभवनात एका भाजप नेत्याच्या मालकीची ५० लाख रुपये किमतीची मोटरसायकल मास्क किंवा हेल्मेट न लावता चालवत आहेत आणि त्याचवेळी नागरिकांना न्यायाचा मूलभूत हक्क नाकारून सर्वोच्च न्यायालय लॉकडाउन करण्यात आले आहे!”
यावरून न्यायमूर्ती भडकले अवमान झाला,न्यायालयाची गंभीर बेअदबी झाली वगैरे कारणे पुढे आली,
आणि प्रशांत भूषण यांच्यावर खटला चालवला गेला. बेअदबीच्या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायमूर्तीनी केली,
न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती गवई यांच्या पीठापुढे झाली.
या पीठाने दिलेल्या १०८ पानी निकालपत्रात बनवले आणि भूषण यांना 1 रुपये रोख इतका दंड ठोठावला होता.
न्यायव्यवस्थेवर लोकांचा अजूनही विश्वास आहे. आमचाही आहे,आदर सन्मान आहे.
न्यायव्यवस्था ही शेवटची जागा म्हणजे लास्ट होप असं सामान्य लोकाना वाटतं.समाज त्यांना अत्यंत आदरस्थानी पाहत असतो,
मात्र त्या पद्धतीने न्यायदान करणाऱ्या न्यायमूर्तीनी सुद्धा वर्तन करावं अशी अपेक्षा सामान्य लोकांची असते.
सोशल मिडियात बातमी खाली सामान्य नागरिक कमेंट करून आपल्या अपेक्षा कळवत असतातच.
आताही असेच एक प्रकरण समोर आले आहे,यामुळे सोशल मिडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा एम सिंह यांनी मनुस्मृती च्या हवाल्याने एक वादग्रस्त वक्तव्य करून
नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. यामुळे समाज माध्यमात आश्चर्य व्यक्त केले जात असून टीकाही सुरू झाली आहे.
भारतीय संस्कृती आणि मनुस्मृती सारखे धर्मग्रंथ महिलांना अतिशय सन्माननीय स्थान देत असल्याने भारतीय महिला धन्य आहेत,
असे त्यांनी बुधवारी एका कार्यक्रमात म्हटलंय.यातील मनुस्मृतीचा उल्लेख वादाचा मुद्दा बनला आहे.
“मला वाटतं की आपण भारतातील अनेक स्त्रिया धन्य आहोत आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी नेहमीच स्त्रियांना खूप सन्माननीय स्थान दिलं आहे आणि जसे मनुस्मृती म्हणते की जर तुम्ही स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला नाही तर तुम्ही करत असलेल्या सर्व पूजापाठाला काही अर्थ राहत नाही.त्यामुळे मला वाटते की आपल्या पूर्वजांना आणि वैदिक धर्मग्रंथांना स्त्रियांचा आदर कसा करायचा हे चांगलेच माहीत होते.”असं प्रतिभा एम सिंह यांनी म्हटलंय.यावर अनेकांनी मत व्यक्त केलेलं आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि गणित (STEM) मधील
महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे: अदृश्य अडथळ्यांचा सामना करणे
या विषयावर आयोजित परिषदेच्या उद्घाटन सत्रात न्यायाधीश बोलत होत्या.
कॉम्रेड कविता कृष्णन, भारतीय कम्युनिस्ट-स्त्रिवादी कार्यकर्त्या,यांनी यावर मत व्यक्त केलं आहे.
कॉम्रेड कविता कृष्णन म्हणतात, दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा सिंह यांना STEM मध्ये
महिलांसमोरील आव्हानांवर बोलण्यास सांगण्यात आले. त्याऐवजी त्यांनी FICCI मधिल उपस्थित प्रेक्षकांना सांगितले:
– भारतातील स्त्रिया धन्य आहेत कारण मनुस्मृतीसारखे हिंदू धर्मग्रंथ स्त्रियांचा “सन्मान” करते.
मनुस्मृती स्त्रियांबद्दल काय सांगते? येथे काही उदाहरणे आहेत,पृथ्वीवर पुरुषांना भ्रष्ट करणे हा स्त्रियांचा स्वभाव आहे;त्या कारणासाठी,सावध पुरुष निष्काळजी होत नाहीत,” “मुलगी, तरुणी किंवा वृद्ध स्त्रीने (स्वतःच्या) घरातही स्वतंत्रपणे काहीही करू नये. बालपणात स्त्रीने तिच्या वडिलांच्या नियंत्रणाखाली, तारुण्यात तिच्या पतीच्या नियंत्रणाखाली आणि जर तिचा नवरा मरण पावला असेल तर तिच्या मुलांच्या नियंत्रणाखाली असावे.”मनुस्मृतीने ज्याला स्त्रियांचा “पूज्य” किंवा “पूजा” म्हटले आहे ते खरे तर स्त्रियांचे नियंत्रण आहे – सर्व काही जातीभेद राखण्यासाठी.
अशा पद्धतीने कविता यांनी काही उदाहरणे देऊन मनुस्मृती मध्ये स्त्रियांच्या बद्दल काय नियम कायदे आहेत हे स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे सोशलमिडिया यावर चर्चा होत आहे,काहींनी प्रतिभा सिंह यांच्याकडे राजीनामा मागण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.
एडव्होकेट असीम सरोदे यांच्या पोस्टवर ही चर्चा पाहता येईल.
मनुस्मृतीचे दहन झाले तरी मनुची मानसिकता जीवंत आहे
हिंदू तरुणाला दाढी पाहून मारहाण; धर्म जाणून घेण्यासाठी अंतर्वस्त्रे काढली
28 तास लटकलेल्या अवस्थेत साधू चा मृतदेह; भाजप आमदारासह तिघांवर गुन्हा दाखल
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 11,2022, 23:20 PM
WebTitle – texts-like-manusmriti-give-women-a-very-honorable-place-justice-pratibha-singh