राजस्थान: राजस्थानमधील करौली जिल्ह्यात एका दलित तरुणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या करून तिच्या अंगावर अॅसिड टाकल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच राज्यसभा भाजपचे खासदार किरोरीलाल मीना धरणे धरून बसले असून. मीना यांनी या मृत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.
सरकारने कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी
सरकारने कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी, दोषींना अटक करावी, कुटुंबातील सदस्यांना कंत्राटी पद्धतीने नोकरी द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. किरोरीलाल मीना यांनी केली आहे.त्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. खासदार म्हणाले की, जिल्ह्यातील बालाघाट पोलीस स्टेशन परिसरात राहणारी तरुणी गुरुवारी पहाटे घरातून बेपत्ता झाली होती. नादौती उपविभागातील भिलापाडा येथील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांकडून आता या संदर्भात गुन्ह्याची नोंद केली गेली असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्याचवेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी कुटुंबीयांना आणि डॉ.किरोरी लाल मीना यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
गावकरी पाणी आणायला गेले तेव्हा कळले
आजूबाजूचे ग्रामस्थ विहिरीत पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत तरुणीचा मृतदेह दिसला. माहिती मिळताच पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. बेपत्ता मुलीची माहिती नातेवाईकांना सोशल मीडियावरून कळली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांसह पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंडौन रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. तिथेच शवविच्छेदनाची कारवाई करण्यात आली.
खासदारांनी पुकारलं धरणे आंदोलन
घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि खासदार डॉ.किरोरीलाल मीना हिंडौन जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि कुटुंबीय गावकऱ्यांसह न्यायासाठी त्यांनी धरणे आंदोलन केले.डॉ.किरोरीलाल मीना यांनी करौली येथे एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडल्याचे सांगत म्हटलं की गेहलोत सरकारच्या राजवटीत कोणतीही मुलगी सुरक्षित नाही. दोषींना तात्काळ अटक करावी, कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी, आश्रितांना नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा..हाथरस प्रकरण: पीडित कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळू नये म्हणून भाजप सरकारची याचिका कोर्टाने फेटाळली
किरोरी लाल मीना यांनी सांगितले की, दलित तरुणीचे अगोदर अपहरण केले जाते आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो.त्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून तिच्यावर अॅसिड टाकून जाळून मारले आणि तिचा मृतदेह विहिरीत टाकून पळ काढला.यापेक्षा निंदनीय घटना काय असू शकते? आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई केली नाही तर मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
मुलीची आई म्हणाली – दोषींवर कारवाई व्हावी
पीडित मृत तरुणीच्या आईने म्हटलं की पहाटे 3 वाजता मास्क लावलेले तीन-चार गुंड आले आणि त्यांनी मुलीला जबरदस्तीने उचलून गाडीत घेऊन गेले, असा आरोप आईने केला आहे. मुलीच्या मृत्यूची माहिती सकाळी सोशल मीडियावरून मिळाली. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, मयत मुलीचे लग्न ठरले असून साखरपुडा झाला होता. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या आईने केली आहे.तरुणीचे वडील कामानिमित्त दुबईत असतात असे कळते.
भाजप प्रदेश प्रभारींनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली
करौलीतील दलित तरुणीच्या घटनेप्रकरणी भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह यांनी
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा मागितला आहे.
अरुण सिंह म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांत दलित अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना राजस्थानमध्ये एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटना का दिसत नाहीत? असा त्यांनी प्रश्न विचारला.
आमचे खासदार डॉ.किरोरीलाल मीना घटनास्थळी आहेत,
उद्या भाजपची आणखी एक राज्यस्तरीय टीम घटनास्थळी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे अनेक नेते ट्विट करून न्याय मागत आहेत
दलित बेटी या हॅशटॅग सोबत भाजप नेते काँग्रेस वर हल्लाबोल करत आहेत.
हेही वाचा.. हाथरस गॅंग रेप: युपी सरकार तोंडघशी,चार्जशिट दाखल
असुरक्षित ‘राज’स्थान !
काँग्रेसची माणुसकी संपली आहे. न जाणो अशा किती बहिणी-मुलींचा आवाज काँग्रेसच्या कुशासनात कायमचा बंद झाला. करौलीची ही घटना अत्यंत हृदयद्रावक आणि निषेधार्ह आहे. अॅसिड टाकून दलित मुलीचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. राजस्थानमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळे महिला असुरक्षित बनल्या आहेत. कारण मुक्तपणे फिरणाऱ्या राक्षसांना काँग्रेस सरकारचे अभय मिळाले आहे. पण आता #नहींसहेगाराजस्थान असं ट्विट भाजप नेते राजवर्धन राठोड यांनी केलंय.
भाजप नेते शाहजाद पुनावाला यांनी ट्विट मध्ये म्हटलंय की,
काँग्रेसच्या शिवीगाळ करणाऱ्या, परखड प्रवक्त्याच्या तोंडात दही गोठले आहे का?
राजस्थानच्या 19 वर्षांच्या दलित मुलीवर गप्प का?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 14,2023 | 10:15 AM
WebTitle – rajasthan Karauli Dalit girl kidnapped, gang-raped, acid thrown on her face and thrown into a well