उत्तर प्रदेशच्या हाथरस प्रकरणात दलित मुलीवर कथित सामूहिक बलात्कार आणि अत्याचार प्रकरणात सीबीआयने चारही आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने शुक्रवारी हाथरस येथील कोर्टासमोर आरोपपत्र दाखल केले.आरोपीचे वकील मुन्नासिंग पुंडीर म्हणाले की, सीबीआयने संदीप, लवकुश, रवी आणि रामू या चार आरोपींवर बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वकील म्हणाले की सीबीआयने एससी / एसटी कायद्यांतर्गतही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे हाथरस प्रकरण ?
हाथरस येथील पीडित मुलगी 14 सप्टेंबरला आई आणि भावासोबत शेतात गवत कापण्यासाठी गेली होती.गावातील तथाकथित उच्चजातीय नराधम गावगुंडांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला.असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता,नराधमांनी फक्त सामूहिक बलात्कारच केला नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी मुलीची जीभ सुद्धा कापली,तीच्या मणक्याचे हाड तोडले,तीच्या शरीराचा एकही अवयव काम करत नव्हता. ती बोलू शकत नव्हती, कुठला इशाराही करू शकत नव्हती.एवढी बेदम मारहाण करण्यात आली होती.ती बोलण्याचा प्रयत्न करत असताना मृत्यू पावली तेव्हा प्रत्यक्षदर्शी पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आल्याचे मिडिया रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले.
पीडित मुलीच्या मृत्यूनंतर वातावरण तापले,आणि राज्यभरात आणि पुढे देशभरात जनता प्रक्षुब्ध झाली.सोशल मिडियातही याचे तीव्र पडसाद उमटले. तेव्हा घाई घाईने पोलिसाना पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी मुलीच्या घरच्यांना सुद्धा शेवटचे पाहण्यासाठी मुलीचे शव देण्यात आले नाही.पोलिस बंदोबस्तातच तिच्या पार्थिवावर 30 सप्टेंबरला पहाटे अडीच वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला.घटनास्थळी असणाऱ्या पत्रकारांनी त्याचे चित्रण सोशल मिडियात live दाखवले.
मात्र युपी सरकार आणि एकूणच प्रशासन व्यवस्था दाद द्यायला तयार नव्हती.यानंतर कहर म्हणजे भाजपच्या नेत्यांनी मुलीच्या चारित्र्यावरही डाग लावण्याचे नेहमीप्रमाणे प्रयत्न केले. यासर्वातून युपीचे सरकार,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात देशभरातील जनतेने तीव्र प्रतिक्रिया दिल्या.चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी याप्रकरणी पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.
आरोपींच्या वतीने त्यांचा बचाव करण्यासाठी जात दांडगे एकत्र –
दरम्यान,आरोपींच्या वतीने गावातील आणि आसपासच्या गावातील तथाकथित उच्चजातीय प्रामुख्याने ब्राह्मण समाजातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर पीडितेच्या कुटुंबियांवर दबाव निर्माण केला. राष्ट्रीय सवर्ण मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष पंडित पंकज धवरैया नामक एका ब्राह्मण तरुणाने आरोपी निर्दोष असून त्यांनी बलात्कार केलाच नाही असा निवाडा पोलिसांच्या समक्ष त्या गावात जाऊन केला होता.तसेच शेकडो लोकाना गोळा करून त्यांनी पीडित कुटुंबियांवर तक्रार मागे घेण्यास तसेच गाव सुद्धा सोडून जाण्यासाठी दबाव आणला.
त्याचा एक व्हिडिओ सोशलमिडियात व्हायरल झाला होता,
ज्या मध्ये त्याने (bhim army) भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद (chandrashekhar azad,ravan) यांना
तुम्ही इथे जातीचे राजकारण करू नका,तुम्हाला कायद्यावर न्यायपालिकेवर विश्वास नाही का?
तु या गावात पाय ठेवून दाखव मग आम्ही तूला शिकवतो कायदा कसा असतो अशी धमकी दिली होती.
विशेष म्हणजे हे सर्व पोलिस समोर असताना घडत होतं,देशात कोरोनाचे संकट आणि एपेडेमीक लॉ म्हणजे 144 सुद्धा लागू होता.
जमावबंदी लागू असताना पीडितेच्या कुटुंबियावरच दबाव आणण्यासाठी शेकडो लोक दहशत निर्माण करत हिंसक भाषेत भाषणे देत होते.
कायदा व्यवस्थेवरून विश्वास उडाला
आज गंमत अशी झाली की सीबीआयने तपास करून जेव्हा निरपराध पीडित मुलीवर खूनापूर्वी आणि तीला जाळण्यापूर्वी बलात्कार झाला असल्याचे स्पष्ट केल्याने राष्ट्रीय सवर्ण मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष पंडित पंकज धवरैया (pankaj dhavraiyya) याचा मात्र अचानक भारताच्या कायदा व्यवस्थेवरून विश्वास उडाला,तसे त्याने जाहीर म्हणत फेसबुकवर पोस्ट केली आहे.
कायदा भ्रष्ट असून तो राजकीय दबावाखाली काम करतो असेही त्याने म्हटले आहे.
पीडितेच्या कुटुंबावरही दबाव
गावातल्याच उच्च जातीतल्या चार जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप असून पोलिसांनी संदीप, लवकुश, रवि आणि रामू या चौघांना अटक ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्या अशा गुन्ह्याखाली चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. या घटनेचे साक्षीदार असलेले पत्रकार सांगतात, पोलिसांनी पुरावे नष्ट करण्यासाठी बळजबरीने मृतदेह जाळला. व्हिडिओमध्ये विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस मारताना, ओरडताना दिसतात. पीडितेच्या कुटुंबावरही दबाव टाकताना दिसतात.
आता याप्रकरणी बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्याने युपीतील भाजप सरकार मुख्यमंत्री आदित्यनाथ उर्फ अजयकुमार बिष्ट काय भूमिका घेणार आहे?
विशेष म्हणजे न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे असा आरोप करणाऱ्या दहशत निर्माण करणाऱ्या
राष्ट्रीय सवर्ण मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष पंडित पंकज धवरैया बद्दल न्यायालय,
अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल काही भूमिका घेणार आहेत का?
जशी कोमेडियन कुणाल कामरा प्रकरणी घेतली होती,हे आणि असे अनेक प्रश्न आता लोकांना पडायला लागले आहेत.
उन्नाव केस : अल्पवयीन मुलींसोबत काय घडलं? एकमेव वाचलेल्या मुलीला AIIMS मध्ये शिफ्ट करण्याची मागणी
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
.