मराठीतील सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.या फेसबुक पोस्टमुळे समाजमाध्यमात खळबळ उडाली आहे.माझ्या जिवाला धोका आहे असं सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे (Vaishali Bhaisne-Made) यांनी आपल्या फेसबुक पोस्ट (Facebook Post) मध्ये म्हटलं आहे.माझ्या हत्येचा कट रचला जात असून दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे असं वैशाली भैसने माडे यांनी म्हटलं आहे. फेसबुक पोस्ट करून त्यांनी आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.तसेच आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे’. असंही त्यांनी म्हटलंय.
गायिका वैशाली भैसने माडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की “काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या support ची गरज आहे.”
गायिका वैशाली यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.गायिका वैशाली यांच्या चाहत्यांना तिची प्रचंड काळजी वाटत आहे. अनेकांनी तिला कमेंट करून स्वतः ची काळजी घेण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. काही कमेंटना प्रतिसाद देताना वैशाली यांनी पोलीस तक्रार केल्याचे म्हटलं आहे.परंतु तक्रार देऊनही काही झाले नसल्याचे कमेंटवरून कळत आहे.एका कमेंट मध्ये त्यांनी आता केवळ न्यायालयात जाऊन दाद मागावी लागणार असल्याचं म्हटलंय.
कोण आहेत वैशाली भैसने माडे?
वैशाली माडे यांचा गाण्याचा प्रवास रियॅलिटी शो ते एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा हा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला आहे. त्यांचं माहेरचं नाव वैशाली भैसने. बालपणी गरिबीमुळे त्यांना खडतर आयुष्यातून अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी त्यांच्यातील गायिका जिवंत ठेवली. पुढे त्यांचं लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील अनंत माडे यांच्याशी झालं. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीचाही मोठा वाटा आहे.
एका सर्वसामान्य मराठी घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आणि प्रेरणादायी आहे. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानंतर वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांच्याकडे विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं.आता त्यांच्या हत्येचा कट कुणी रचला आहे? त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हे दोन दिवसांनी स्पष्ट होणार आहे. तूर्तास त्यांनी केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
इतर वाचनीय लेख
Hijab Issue : कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू, वकिलांचा युक्तिवाद
हिजाब प्रकरण म्हणजे शिक्षणाच्या भगवीकरणाचे रक्षण
रशिया युक्रेन संघर्षामागील कारणे;आतापर्यंत काय घडले पहा अपडेट्स
कर्नाटक हिजाब विवाद सुरु असतानाच दुसरीकडे केरळ सरकारची हिजाब वर बंदी
पहिल्या स्कूटरपासून ‘हमारा बजाज’ पर्यंतचा प्रवास
कोटा मध्ये 82 हजार किलोची घंटा बांधली जात आहे,काय आहे खास?
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
Monginis controversial ad:कुत्र्याला फुलनदेवी नाव दिल्याने संताप
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 18, 2022 16 :58 PM
WebTitle – ‘My assassination plot is being hatched’, says Bollywood singer Vaishali Bhaisane made a shocking Facebook post