महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार!
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना महिलांसाठी महिला दिनाच्या निमित्ताने मोठी घोषणा केली.महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे.महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत अजित पवार यांनी ही घोषणा केली.
माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी 8 मार्चचं महत्व सांगितलं होतं.आजच्या महिला दिनी मी आता विद्यार्थिनी गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे.ज्या महिलेमुळे घराला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही.महिला सक्षमीकरण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “तमाम महिलांच्या अपेक्षेला न्याय देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना आज मी घोषित करत आहे.कोणतंही कुटुंब यापुढे राज्यात घर घेईल तेव्हा त्याची नोंदणी गृहलक्ष्मीच्या नावे व्हावी आणि खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी व्हावी यासाठी प्रोत्साहन म्हणून १ एप्रिल २०२१ पासून गृह खरेदीची नोंदणी त्या कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक दरात सवलत दिली जाईल.”
महिलेच्या नावाने घर खरेदी केल्यात मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत मिळणार असल्याचे राज्यातील अर्थसंकल्पात सांगण्यात आले.
मात्र या योजनेमुळे राज्याला १ हजार कोटींची महसूली तूट होणार असल्याचेही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
कोरोनाच्या संकटात बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने 1 सप्टेंबरपासून 6 टक्के असलेल्या मुद्रांक शुल्कात 3 टक्क्यांपर्यंत कपात केली होती.
मुद्रांक शुल्क म्हणजे काय?
जेव्हा मालमत्तेचा व्यवहार होतो तेव्हा सरकार कर आकारते तो कर ‘स्टॅम्प ड्यूटी’ म्हणून ओळखला जातो.निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता व्यवहार, तसेच फ्रीहोल्ड किंवा भाडेपट्टी मालमत्तांवर हा कर आकारला जातो.मुद्रांक शुल्क राज्यकडून आकाराला जात असल्याने प्रत्येक राज्यातील कर वेगवेगळे दिसतात. कारण कागदपत्रांवरील मुद्रांक चिन्ह ही साक्ष आहे की कागदाने अधिकाऱ्यांची मान्यता स्वीकारली आहे आणि आता त्यास कायदेशीर वैधता आहे. विविध उपकरणांच्या नोंदणीवर मुद्रांक शुल्क भारतीय मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदीखाली लादले गेले आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की जगातील बहुतेक विकसनशील, विकसनशील आणि अगदी विकसित-विकसित देशांप्रमाणेच मुद्रांक शुल्क तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे.
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 07, 2021 17:15 PM
WebTitle – mahabudget 2021 maharashtra budget deputy cm ajit pawar woman day stamp duty relaxation