उत्तरप्रदेश , गोंडा: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील एका गावातून सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही स्थानिक लोक तीन मुस्लिम फकीरांना शिवीगाळ करताना आणि त्रास देताना दिसत आहेत.तरुणांनी या फकीर व्यक्तींशी असभ्य वर्तवणूक करत जय श्रीराम चा नारा देखील देण्याची सक्ती केली.
याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, गोंडा जिल्ह्यातील डिंगूर गावात शूट केलेल्या या सेलफोन व्हिडिओमध्ये, तीन मुस्लिम फकीरांना काही तरुण पाठलाग करताना दिसत आहेत, जे त्यांना धर्माशी संबंधित शिवीगाळ करताना दिसतात. काही लोक त्यांना मारहाण करण्याबाबत बोलतानाही दिसत आहेत.
चिंताजनक बाब म्हणजे व्हिडिओ मध्ये लहान मुलांचा देखील आवाज ऐकण्यास येतो आणि त्यांच्याकडून आलेल्या सूचना एक देश म्हणून एक समाज म्हणून आपण इथं कोणती पिढी घडवत आहोत याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झालीय का असा प्रश्न उपस्थित होतो.
यादरम्यान मोठी काठी घेऊन आलेल्या एका तरुणाने त्यांना घेरले आणि त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली. त्यांच्याकडे काहीच नव्हते हे ऐकून तो त्यांना ‘जिहादी’ आणि ‘दहशतवादी’ म्हणतो.
“तुझा अड्डा दाखव, नाहीतर तुझ्या आत जे आहे ते आम्ही बाहेर फेकून देऊ’, असे म्हणताना आपण त्या तरुणाला ऐकू शकतो.
एक व्यक्ती यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असता त्याना हा आरोपी तरुण दूर ढकलत, “तुम्ही यात पडू नका,दूर रहा” असे बजावताना दिसत आहे. तसेच या (फकीर व्यक्तींना) फकीरांना कान पकडून उठाबशा काढायला लावून ‘ जय श्रीराम ‘ चा नाराही लावण्यास सांगितले जाते.
आरोपीला घेतले ताब्यात
सीओ सिटी गोंडा लक्ष्मीकांत गौतम यांनी सांगितले की, फकीरांच्यासोबत एका व्यक्तीने असभ्य वर्तन केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
या संदर्भात खरगुपूर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून हे तिघे कोण (फकीर) होते आणि कोणत्या कारणासाठी त्या ग्रामसभेला गेले होते,
याचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.असे सीओ सिटी गोंडा लक्ष्मीकांत गौतम यांनी सांगितले.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 09 2022 19 : 28 PM
WebTitle – Fakirs threatened, forced to chant Jai Shriram, youth arrested