भंडारा जिल्हा सामान्य हॉस्पिटल मधिल अतिदक्षता (SNCU) नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत्युमुखी पडलेल्या बाळे एक ते तीन महीने वयाची असल्याची माहिती मिळत आहे.ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं.
मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना
लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं.
भंडारा हॉस्पिटल मध्ये लागलेल्या आगीच्या धूरात दहा बालकांचा गुदमरून मृत्यू
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यानी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली तसेच तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अत्यंत वेदनादायी घटना अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सिविल सर्जन आणि सुपरिंटेंडेंट यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्याकडून दु:ख व्यक्त,उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
गृहमंत्र्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
अतिशय दुर्देवी घटना आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, नॅशनल फायर कॉलेज आणि व्हिएनआयटी कॉलेज मिळून या घटनेचे फायर ऑडिट करतील. राज्य शासनाने मृताच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)