शहापूर /ठाणे ( आशा रणखांबे ) तमाम अधिकारी व कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे शिखर संघटन म्हणजेच रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन होय.ही संघटना विविध सामाजिक कार्यात अग्रणी आहे. शहापूर येथे ठाणे जिल्हा, शहापूर तालुका व मुरबाड तालुका यांच्या वतीने सभासद नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमा विषयी संयुक्त सभेचे आयोजन ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख कामगार नेते संजय थोरात यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13-06-2021 रोजी संपन्न झाली.
यावेळी सभेस ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ सरनोबत , ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष शालीग्राम तायडे, ठाणे जिल्हा संघटनक नवनाथ रणखांबे, शहापूर तालुका अध्यक्ष कमलाकर वांगीकर, मुरबाड तालुका अध्यक्ष विलास शिंदे, मुरबाड तालुका प्रसिद्धी प्रमुख विशाल चंदने, राजीव चंदने, शरद रातांबे, आनंद गायकवाड, शिरीष पानपाटील, भीमराव राऊत, मनोहर पवार, आदी मान्यवर उपस्थितीत होते.

ठाणे जिल्हात रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची अधिकाधिक सभासद नोंदणी सुरु करणे,
जिल्हयात संघटनेची ताकद वाढवणे, पदोन्नती आरक्षण विषयक भूमिका, गुणवंतांचा सत्कार, इ. विषयावर चर्चा झाली.
शहापूर तालुका अध्यक्ष कमलाकर वंगीकर यांनी शहापूर कार्यकारणी कडून सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिरीष पानपाटील यांनी केले.
आरक्षण हक्क कृती समिती आक्रोश मोर्चाच्या सरकार विरोधी घोषणांनी आझाद मैदान दुमदुमले
मुंबई (प्रतिनिधी) : संविधानिक हक्क व मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याच्या षडयंत्राविरुध्द राज्यभर जिल्हाधिकारी,
तहसिलदार कार्यालयांना निवेदन देऊन तसेच काही आमदार, विविध समाजातील नेते, राजकीय पक्षनेते इत्यादींना संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात पत्र देऊनही कोणतीही चर्चा अथवा कारवाही झाली नसल्याच्या निषेधार्थ आरक्षण हक्क कृतीच्या माध्यमातून समस्त अनुसुचित जाती जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग अन् ओबीसी समाजाच्यावतीने आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी आझाद मैदानात आज प्रचंड आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)