डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरीत बौद्धांना दिलेल्या (22 Pratidnya) २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत.22 vows
![22 Pratidnya २२ प्रतिज्ञा 22 vows 22 pratidnya dr.babasaheb ambedkar buddha dhamma](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2021/10/२२-प्रतिज्ञा-बौद्ध-धम्म-बुद्ध-भगवान-595x1024.webp)
1 मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
2 मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
3 मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
4 देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
5 गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
6 मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
7 मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
8 मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
9 सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
10 मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
11 मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
12 तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
13 मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
14 मी चोरी करणार नाही.
15 मी व्याभिचार करणार नाही.
16 मी खोटे बोलणार नाही.
17 मी दारू पिणार नाही.
18 ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
19 माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
20 तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
21 आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
22 इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
![22 Pratidnya २२ प्रतिज्ञा 22 vows 22 pratidnya dr.babasaheb ambedkar buddha dhamma](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2023/12/22-vows-22-pratidnya-dr.babasaheb-ambedkar-buddha-dhamma-724x1024.webp)
TAG 22 Pratidnya, २२ प्रतिज्ञा
धर्मांतराने काय मिळाले आणि काय मिळवले ?
दलित धर्मांतर:दलितांना सन्मान द्यायला कमी पडतो म्हणून ते धर्मांतर करतात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 15, 2021 19:00 PM
Updated on 19 July 2023 , 10:30 AM
WebTitle – 22-Pratidnya-by-dr-ambedkar-in-marathi-२२-प्रतिज्ञा-मराठी