बिहारमधील भागलपूरमध्ये मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बांधण्यात येत असलेला निर्माणाधीन पूल बांधण्यापूर्वीच कोसळला. सुमारे 1710 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा पूल शुक्रवारी झालेल्या हलक्या वादळात देखील तग धरू शकला नाही आणि त्याचा काही भाग आताच जीर्ण देखील झाल्याचे बोलले जात आहे.सुदैवाने या अपघातात कुणाही बळी गेले नाही सर्वसामान्य नागरिक व मजूर बचावले या अपघातातून बचावले आहेत. मात्र, राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूरमधील सुलतानगंज येथे 3.160 किमी लांबीचा पूल बांधला जात आहे.
9 मार्च 2015 रोजी या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. खगरिया बाजूकडून 16 किलोमीटर लांबीचा रस्ता
आणि सुलतानगंज बाजूकडून चार किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे.
या पुलाच्या बांधकामामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खगरियाहून भागलपूरला जाण्यासाठी फक्त 30 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल.
भ्रष्टाचाराचा आरोप
सुमारे 1710 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा पूल शुक्रवारी झालेल्या हलक्या वादळात देखील तग धरू शकला नाही आणि तो कोसळला.पुलाचा काही भाग कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेले जेडीयूचे आमदार ललित नारायण मंडल म्हणाले, पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या बांधकामात दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे हा पूल किरकोळ वादळ आणि पाऊसही सहन करू शकला नाही. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आले असून, लवकरच याची चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
खगरिया ते भागलपूर हे 90 किमी चे अंतर 30 किमी होणार
उत्तर बिहार थेट झारखंडशी मिर्झा पोस्ट मार्गे खगरिया बाजूच्या 16 किमी लांबीच्या मार्गाने आणि सुलतानगंज बाजूपासून 4 किमीच्या मार्गाने जोडला जाईल. त्यामुळे विक्रमशिला सेतूवरील वाहनांचा ताण कमी होणार आहे. याशिवाय, खगरिया ते भागलपूर हे 90 किलोमीटरचे अंतर फक्त 30 किलोमीटरपर्यंत कमी होईल असे बोलले जातेय.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 01, 2022 16:53 PM
WebTitle – The Rs 1,710 crore bridge collapsed in bihar before it could be completed