अमेरिकेत बुधवारी कॅपिटल बिल्डिंगवर ट्रंप समर्थकांनी हल्ला केला.या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.ट्रंप यांचा पराभव मान्य नसलेल्या ट्रंप समर्थकांनी हा हल्ला केला आहे.नव-नियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठीची चर्चा सध्या अमेरिकन काँग्रेसमध्ये सुरू आहे.बुधवारी ( 6 जानेवारी) ही चर्चा सुरू असतानाच कॅपिटल इमारतीच्या बाहेर निदर्शनं करत असलेले ट्रंप समर्थक इमारतीत घुसले. हे आंदोलक सदनापर्यंत पोहोचल्याने चर्चा थांबवण्यात आली होती.
मात्र चिंतेची बाब ही सुद्धा आहे की ट्रंप यांचे समर्थन करणाऱ्या लोकांमध्ये भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं समर्थन भारतातील हिंदुत्ववादी उघडपणे करताना दिसून येतात.
ट्रंप यांचा विजय व्हावा म्हणून राष्ट्रवादी हिंदू सेना यांनी चक्क होमहवन केले होते.
इथे पाहा – होम हवन करूनही ट्रंप यांचा पराभव का झाला?
अमेरिकेतील भारतीय वंशाचे तथाकथित उच्चजातीय लोक आजही उघडपणे डोनाल्ड ट्रंप यांचे समर्थन करतात.त्यामुळे या हल्ल्यात भारताचा राष्ट्रध्वज फडकलेला दिसल्यामुळे भारतात चिंता व्यक्त करण्यात येत असून सोशल मिडियात यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हा राष्ट्रध्वज फडकवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे.भारतासाठी ही गोष्ट अतिशय संवेदनशील आणि काळजी करण्यासारखी असून जागतिक पातळीवर यामुळे भारताची प्रतिमा मलिन होऊ शकते.अशा कृत्यात भारताचे राष्ट्रप्रतीक तिरंगा ध्वज फडकवणे निषेधार्ह बाब मानली पाहिजे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना या घटनेवर ट्विट केलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की,’वॉशिंग्टन डीसीमध्ये राडा आणि हिंसा याची माहिती मिळाल्यानंतर मी जास्त चिंतित आहे. सत्तेचं हस्तांहरण हे अतिशय क्रमबद्ध आणि शांतपूर्वक व्हायला हवं.’
खासदार वरुण गांधी यांनी ट्विट करून याबाबत चिंता व्यक्त केली असून हे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा.. सावधान..! भारत उत्तर कोरिया होतो आहे
हेही वाचा.. होम हवन करूनही ट्रंप यांचा पराभव का झाला?
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)