अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून येण्यासाठी भारतातील हिंदू धर्मीय लोकांनी,पूजा-अर्चा, होम हवन केले होते.भारताचे प्रधानमंत्री डोनाल्ड ट्रम्प यांना नरेंद्र मोदी यांचे खास मित्र असं सांगण्यात येतं. “माय फ्रेंड दोलांद” हे नरेंद्र मोदींचे उद्गार सोशल मिडियात गाजत असतात
जगभरात कोरोना कहर असताना आणि जग लॉक डाउन आणि इतर गोष्टी उपाय योजना करत असताना नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांची मोठी “नमस्ते ट्रम्प” ही इलेक्शन रॅली आयोजित केली होती.या रॅली मध्ये हजारो लोक सामील झाले होते.या रॅली मुळे भारतात कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने झाला असा काही विरोधकांचा आरोप आहे.
मात्र,नरेंद्र मोदींच्या मित्राला पराभवाचा सामना करावा लागला आहे.ज्यो बायडेन यांना 290 तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रॉल मते मिळाली.
हे फक्त होम हवन पर्यन्त मर्यादित नव्हते,तर काही प्रसिद्ध ज्योतिषांनी, डोनाल्ड ट्रम्प निवडून येतील असे भाकीत केले होते.भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी या संदर्भात ट्विटद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांची थेट कुंडलीच प्रसिद्ध केली होती.
ज्योतिष डॉक्टर शंकर चरण त्रिपाठी यांनी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा येतील असा दावा केला असे अवधूत वाघ यांनी ट्रम्प यांना मेन्शन करत कळवले.हे ज्योतिषी प्रसिद्ध आहेत असे अवधूत वाघ यांनी म्हटले आहे.ट्रम्प निवडून आले असते तर त्याचे काही श्रेय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला द्यावे लागले असते.मात्र तसं काही घडलं नाही.उलट घडलं.
अशा गोष्टी करून विजय मिळत नाही.यश मिळत नाही. असे या घटनेवरून बोलता येईल.
इथं काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या राजकीय प्रचारात भारताच्या विरोधात वाईट भाषेचा प्रयोग केला. त्यांनी भारताविरुद्ध मोहीम उघडली. विजाचे नियम सुद्धा कडक केले होते.त्यामुळे डोनाल्ड ट्रंप हे यांची भूमिका ही भारत विरोधी राहिली. असे असतानाही त्यांच्या विजयासाठी होम हवन केले जाते.हे फारच दु:खद आणि गंभीर सुद्धा ठरते.
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 28, 2021 20:40 PM
WebTitle – Ambedkar and Periyar said on the martyrdom of Bhagat Singh