हनी ट्रॅप : DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास) प्रयोगशाळेच्या अभियंत्याला शुक्रवारी एका पाकिस्तानी महिला गुप्तहेरासोबत देशाची संवेदनशील माहिती शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैदराबाद येथील DRDL (संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा) च्या अभियंत्याने देशाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची गुप्तचर माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. महिला गुप्तहेराने ब्रिटनच्या डिफेन्स जर्नलची पत्रकार म्हणून आपली ओळख उघड करून ही माहिती मिळवली.
हनी ट्रॅप : DRDO प्रकरणी अनेक कलमांत अभियंत्यावर गुन्हा दाखल
तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, 29 वर्षीय आरोपी दुक्का मल्लिकार्जुन रेड्डी हा विशाखापट्टणमचा रहिवासी आहे आणि तो बाळापूर येथील डीआरडीओच्या प्रगत नौदल प्रणाली कार्यक्रमाच्या संशोधन केंद्र इमारतीत (RCI) क्वालिटी इन्श्योरंस अभियंता म्हणून काम करतो. त्याला राचाकोंडा पोलिस आणि बाळापूर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन पथकाने मिरपेठ येथील घरातून ताब्यात घेतले.
त्याच्यावर भारतीय कायद्याच्या कलम 409 (क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट) आणि अधिकृत गुप्तता कायदा,
1923 च्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, एक सिमकार्ड आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.
फेसबुकवर झाला DRDO अभियंत्याचा हनी ट्रॅप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खाजगी कंपनीत दोन वर्षे काम केल्यानंतर,
रेड्डी 2020 मध्ये करारावर डीआरडीओच्या लॅबमध्ये रुजू झाला. त्याने त्याच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये लिहिले की,
तो डीआरडीओच्या लॅबसाठी काम करतो आहे.
नताशा राव नावाचे बनावट खाते तयार करून पाकिस्तानी महिला गुप्तहेरने या अभियंत्याला जाळ्यात अडकवले होते.
नताशा राव व्यतिरिक्त या गुप्तहेरने सिमरन चोप्रा आणि ओमिशा अद्दी यांसारखी अनेक नावे वापरली आहेत.
दोन वर्षांपासून तो नताशाच्या संपर्कात होता. या दोन वर्षांत त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून
आरसीआयच्या RCI क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाशी संबंधित फोटो आणि कागदपत्रे हेरांसोबत शेअर केली आहेत.
मार्च 2020 ते डिसेंबर 2021 पर्यंत संपर्कात
पोलिसांनी सांगितले की, नताशा रावने मार्च 2020 मध्ये मल्लिकार्जुन रेड्डी ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ते दोघे डिसेंबर 2021 पर्यंत संपर्कात होते. नताशा रावने सुरुवातीला स्वत:ला यूके डिफेन्स जर्नलची कर्मचारी असल्याचे सांगितले आणि सांगितले की ती पूर्वी बंगळुरूमध्ये राहत होती. तिचे वडील भारतीय हवाई दलात होते, ते नंतर ब्रिटनला स्थायिक झाले.तीने मल्लिकार्जुनला त्याचे प्रोफेशन, ऑफिस लोकेशन आणि कंपनीबद्दल विचारले. या संभाषणात आरोपीने नताशासोबत संवेदनशील अशी गुप्त माहिती शेअर केली. इतकच नाही तर आरोपीने नंतर त्याचे बँक खातेही तीच्यासोबत शेअर केले.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
अग्निपथ योजना नेमकी काय? देशभरातील तरुण नाराज,अनेकठिकाणी जाळपोळ
200 किलो आंब्याचा रस खाल्ल्यानंतर देव आजारी पडला,वैद्यांचा उपचार सुरू
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 18, 2022, 19:’42 PM
WebTitle – DRDO Honey trap: DRDO engineer arrested for leaking intelligence