आईने पोटच्या चार वर्षाच्या मुलीला चवथ्या मजल्यावरून फेकले: मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे लोक हादरले आहेत, बेंगळुरूमधील एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मूकबधिर मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून ठार मारलं. पोलिसांनी सांगितले की आरोपी महिला ही डेंटिस्ट असून आपलं मूल जीला बोलताही येत नाही, हे आपल्या करिअरच्या, प्रगतीच्या मार्गावर अडथळा बनत आहे.त्यामुळे महिलेने थेट असं टोकाचं पाऊल उचललं.या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.आणि सोशल मिडियात तो व्हायरल होत आहे.
आईने पोटच्या चार वर्षाच्या मुलीला चवथ्या मजल्यावरून फेकले
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आई तिच्या मुलीसोबत बाल्कनीत फिरताना आणि नंतर तिला खाली फेकताना दिसत आहे. नंतर, आरोपी सुषमा भारद्वाज (मुलीची आई) नेही बाल्कनीतून उडी मारण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेजाऱ्यांनी तिला वाचवले.मात्र बाळाचा जागीच मृत्यू झाला होता. महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पोलिसानी पतीने दिलेल्या तक्रारीनुसार महिलेला अटक केली आहे.
बेंगळुरूमधील संपंगीराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी ही घटना घडली
सीकेसी गार्डनमधील अद्वैथ आश्रय अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर हे जोडपे राहत होते.मुलीला खाली फेकल्यानंतर आरोपी महिलाही उडी मारून आत्महत्या करत असताना शेजाऱ्यांनी तिच्या मदतीला धावून तिला सुरक्षित खाली खेचले.दरम्यान, आईने फेकून दिल्यानंतर मुलगी जमिनीवर कोसळली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला एका रहिवाशाने उचलले आणि तातडीने खाजगी रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार केले, मात्र मुलगी वाचू शकली नाही,तिचा मृत्यू झाला.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वीही सुषमा हिने आपल्या मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याचा प्रयत्न केला होता.
याची माहिती मिळताच त्यांचे पती किरण यांनी तात्काळ स्टेशनवर धाव घेत मुलीला शोधून आणलं होतं असे पोलिसांनी सांगितले.
आईवर खुनाचा गुन्हा दाखल
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दाम्पत्याची चौकशी केली. महिलेचा पती किरणच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सुषमा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “प्रथम तपासात असे दिसून आले की आई मुलीच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल खूश नव्हती आणि म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असे म्हटले जात आहे.”
VIDEO : देशात हिंदू कॅलेंडर लागू करा,मंगळवारी सुट्टी द्या,संस्कृत शिक्षक नेमा
विज्ञान आणि भगवान बुद्ध: बुद्ध कालबाह्य आहे ?
New Wage Code: खाजगी क्षेत्रात आठवड्यातून 4 दिवस काम – 3 दिवस सुट्टी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 05,2022, 19:33 PM
WebTitle – dentist mother throw her daughter from 4th floor in Bengaluru