जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहेत.लस तयार करण्याचे आणि टोचण्यासाठीची व्यवस्थाही युद्ध पातळीवर तयार केली जात आहे.मात्र कोरोनाची लस येण्याआधीच ती घ्यायची की नाही यावरून नवा वाद होत आहे.काही मुस्लीम संघटनांनी यात डुकारचे अंश असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे तर आता हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीत गाईचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
कोरोनाच्या लसीत गाईचं रक्त?
गायीचं रक्त असणारी कोरोना लस देशामध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये
अशी मागणी स्वामी चक्रपाणि यांनी केली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चक्रपाणि यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिल्याची माहिती मिळत आहे.
स्वामी चक्रपाणि यांनी केलेल्या निवेदनामध्ये जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे
हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही
तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असं म्हटलं आहे.
स्वामी चक्रपाणी हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिध्द आहेत.या अगोदर त्यांनी कोरोना व्हायरस हा व्हायरस नसून “अवतार” असल्याचे म्हटले होते. “हा अवतार प्राण्यांना खाणाऱ्याना मृत्यूची शिक्षा देतो आणि तसा संदेश देतो”असा अजब दावा त्यांनी केला होता.
नंतर त्यांनी कोरोना बरा करण्यासाठी गोमूत्र हा उपाय असल्याचा दावा केला होता.इतकेच नाही तर पुढे त्यांनी त्यासाठी खास गोमूत्र पार्टी चे आयोजन देखिल केले होते.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)