ठाणे, 20 फेब्रुवारी: समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे. मध्यतंरी शांत झालेले प्रकरण पुन्हा सुरु झाल्याचे दिसत आहे.नवाब मलिक यांनी ट्विटवर बातमी शेअर केल्याने आता पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी रात्री कोपरी पोलीस ठाण्यात (Kopari police station) वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असा आरोप वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे.
बारचा परवाना रद्द
बार परवाना मिळविण्यासाठी वय आणि कागदपत्रे खोटी केल्याप्रकरणी एनसीबीचे माजी झोन प्रमुख
समीर वानखेडे यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर,FIR ) दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला होता.
समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्या नंतर कोपरी पोलिस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आयपीसी कलम 181, 188, 420, 465, 478, 481 अशी कलमे सुद्धा लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आरोप केला होता की समीर वानखेडे यांचा नवी मुंबईत बार आहे ज्यासाठी त्यांना अल्पवयीन असतानाच 27 ऑक्टोबर 1997 रोजी परवाना मिळाला होता. नवाब मलिक यांनी दावा केला होता की, समीर वानखेडे यांना नवी मुंबईतील हॉटेल सदगुरुमध्ये बारचा परवाना मिळाला तेव्हा ते केवळ १७ वर्षांचे होते.
पॉवर ऑफ अॅटर्नी वडिलांच्या नावे – समीर वानखेडे
एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना समीर वानखेडेंनी म्हटलं होतं की, हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच पॉवर ऑफ अॅटर्नी वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केली होती.या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू होती. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द केला.
इतर वाचनीय लेख/बातम्या
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 20, 2022 12:02 PM
WebTitle – case register against Sameer Wankhede for giving false information