पाकिस्तान,कराची : बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या मजीद ब्रिगेडने मंगळवारी पाकिस्तान मधील कराची विद्यापीठाच्या आवारात चिनी नागरिकांना लक्ष्य करून आत्मघाती हल्ला केला.गाडीजवळ येताच महिलेने स्वत:ला ब्लास्ट करून उडवले,या हल्ल्यात तीन चीनी नागरिक ठार झाले तर १ पाकिस्तानी नागरिक वाहन चालक ठार झाला.या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी ने स्वीकारली आहे.पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
पाकिस्तान मध्ये महिलेने स्वत:ला ब्लास्ट करून उडवले
बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांच्या म्हणण्यानुसार, महिला आत्मघातकी बॉम्बर शरी बलोच उर्फ ब्रमश हिने आज कराचीमध्ये
“चीनी लोकांवर आत्मघातकी हल्ला” केला. या हल्ल्यात ठार झालेल्या चार जणांमध्ये तीन चिनी नागरिकांचा समावेश आहे.
बीएलएच्या प्रवक्त्याने शरीचे छायाचित्र देखील शेअर केले आणि दावा केला की महिला आत्मघाती बॉम्बरचा वापर करून त्यांनी बलूच प्रतिकार इतिहासात एक नवीन अध्याय जोडला आहे. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या चिनी नागरिकांमध्ये किमान दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
हल्ल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखा घातलेली महिला कराची विद्यापीठातील चिनी भाषा शिक्षण केंद्र कन्फ्यूशियस संस्थेच्या प्रवेशद्वाराबाहेर उभी असल्याचे दिसले. व्हॅन संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच महिलेने स्वत:ला स्फोट घडवून उडवले.
पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी कराची बॉम्बस्फोटाचा निषेध केला
दरम्यान, पाकिस्तानचे नवे प्रधानमंत्री शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून दोषींना लवकरच न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.
“आज कराचीमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात आमच्या चिनी मित्रांसह मौल्यवान जीव गमावल्याबद्दल मला खूप दुःख झाले आहे. माझ्या शोकसंवेदना मी शोकशील कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. दहशतवादाच्या या भ्याड कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. गुन्हेगारांना नक्कीच न्याय मिळवून दिला जाईल. ” पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांनी असं ट्विट मध्ये म्हटलंय.
कराचीचे पोलीस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी सांगितले होते की, प्राथमिक तपासानुसार बुरखा घातलेल्या महिलेचा या आत्मघातकी स्फोटात सहभाग असू शकतो.
“पोलिसांनी स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे आणि सध्या त्याचे विश्लेषण केले जात आहे,” हैदर म्हणाले की, फुटेजमध्ये दिसणारी बुरखा घातलेली महिला ही आत्मघाती बॉम्बर होती की नाही हे तपासले जात आहे, असे डीआयजी म्हणाले.
संसाधनसंपन्न बलुचिस्तान प्रांतासह पाकिस्तानमधील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये चीनचा मोठा सहभाग आहे.
पाकिस्तानी तालिबानप्रमाणेच बलुच लिबरेशन आर्मी या गटाने अनेक वेळा चिनी नागरिकांना लक्ष्य केले आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
..तर राज ठाकरे यांच्यावर UAPA लावा वंचितची बैठकीत मागणी
आसाम : काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांची सुटका होताच पुन्हा अटक
नमाजच्या वेळी मशिदीत मोठा स्फोट,लहान मुलांसह 33 ठार
१४ एप्रिल:डॉ.आंबेडकर समता दिन,कॅनडा नंतर या देशात होणार साजरा
पुण्यात ब्राह्मण महासंघाचे आंदोलन; अंगावर आलात तर..-रूपाली पाटील
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 26, 2022 21: 03 PM
WebTitle – blast in pakistan karachi university by Female suicide bomber