शिर्डी : प्रतिनिधी/ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा नुकताच शिर्डी येथे पार पडला. यावेळी शिर्डी लोकसभेसाठी ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत करण्यात आली.याप्रसंगी पक्षाचे जिल्हा प्रभारी सुरेश शेळके कार्यलयीन सचिव मा,रतन बनसोडे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे उत्तर महाराष्ट्र संघटक मा,शरद खरात आदीसह उत्तर नगर जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांची मते व भूमिका देखील जाणून घेण्यात आली. यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी मागील लोकसभेच्या निवडणुकीत वंचित उमेदवाराला ६३ हजार विक्रमी असे मतदान मिळालेले होते त्यामुळे या निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर उमेदवार उभा करावा त्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते एक विचाराने काम करतील असा सूर पुढे आला आहे.

वंचितची ताकद वाढत आहे
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी आपल्या भाषणात नगर जिल्ह्यात पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे संघटन करून सर्वदूर ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची फळी उभी केलेली असून गेल्या पाच वर्षात पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी मोठा पाठपुरावा व प्रयत्न करण्यात आले आहे
पक्षाची वाढलेली ताकद पाहता पक्ष देईल त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण सर्वजण काम करणार असून
शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी केल्यास मतदार नक्कीच संधी देतील असा विश्वास
व्यक्त करून वंचितच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी एक विचाराने काम करावे
त्यासाठी वंचित चे सर्व पदाधिकारी तुमच्या पाठीशी राहतील असे आश्वासन देऊन
आपण जनतेत जाऊन काम केले तर जनता आपल्याला निश्चितपणे सत्तेत वाटा दिल्याशिवाय राहणार नाही
त्यामुळे या मतदारसंघात जो उमेदवार माजी खासदार प्रकाश आंबेडकर देतील त्याचा आपण प्रचार करणार असलो
तरी या मतदारसंघात आंबेडकर यांनीच उमेदवारी करावी असा असलेला जनमताचा कौल पाहता
विजय देखील आपल्याला मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
हा जिल्हा जरी साखर सम्राटचा असला तरी डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे आपल्या कामाच्या माध्यमातून वंचितच्या माध्यमातून संपूर्ण देशभर असणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे जनतेचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावण्यासाठी मोठा लढा आतापर्यंत दिलेला आहे असे सांगितले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी वाल्मीकराव गोतीस डॉक्टर जालिंदर घिगे,पिंटू साळवे,लखन वाघमारे,चरण त्रिभुवन,संतोष शेळके,सोमनाथ कीर्तने,वर्षा बाचकर,दीपक कसबे,अजिज ओहरा,नितीन बनसोडे आदीसह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण जाणून घ्या…
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 14,2024 | 12:58 PM
WebTitle – Adv Prakash Ambedkar should be candidate for Shirdi Lok Sabha