नववर्षाची सुरुवात करत असताना 1 जानेवारी १८१८ रोजी घडलेलं युद्ध नेहमीच देशात चर्चेत असतं, गेली काही वर्षे यावर मनुवादी लोकांकडून चुकीची माहिती देत विरोध सुरू झाला आहे.मात्र या मूठभर लोकांना समाजाने गांभीर्याने घेतलं नाही,सर्व समाजात हि ऐतिहासिक घटना आता स्वीकारली गेलीय.अनेकजण याबद्दलची आपलं मतं मांडत असतात.सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अरुण कदम यांनी भीमा कोरेगाव संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.ती आता प्रचंड व्हायरल होत आहे.
अनेक विनोदी चित्रपट, नाटक याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांना आनंद देणारे अभिनेते अरुण कदम
हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
अरुण कदम सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते त्यांचे विचार, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली, ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे केलेल्या भाषणातील एक महत्वाचं विधान अरुण कदम यांनी त्यांच्या पोस्टमधून शेअर केलंय. या पोस्टमध्ये “विजयस्तंभ भिमा कोरेगाव ऐतिहासिक पुरावा” असा उल्लेख आहे.त्यासोबत “तुम्ही शूर वीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.” असं लिहिलेलं आहे. आणि त्यासोबत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर (दिनांक २५.१२.१९२७ महाडचे भाषण)” असाही संदर्भ दिलेला आहे. आता त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आता त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
करणी सेना च्या अजयसिंग सेंगर वर गुन्हा दाखल
पल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 01,2023 11:33 AM
WebTitle -Actor Arun Kadam’s post about Bhima Koregaon goes viral