भारतात बौध्द धर्मियांची सर्वात महत्वपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली दोन श्रध्दास्थळं आहेत… पहीले बोधगयाचे महाबोधी महाविहार आणि दुसरे नागपूरचे दिक्षाभुमी…
महाबोधी महाविहार येथे या जगाला बुध्द मिळाले आणि दिक्षाभुमी येथे बाबासाहेबांनी लाखोकरोडो दिनदुबळ्यांच्या निर्जीव झालेल्या शरीरात प्राण फुकण्यासाठी पुन्हा सर्वांना बुध्द दिले… माञ शोकांतिका की शरमेची बाब तर हे दोन्ही सर्वोच्च प्रेरणास्थान भारतीय बौध्दांच्या ताब्यात नाहीत…
महाबोधी महाविहारासाठी आम्ही केव्हाच लढतोयं ? आणि लढतच राहु… मात्र आज त्याचबरोबर दिक्षाभुमीची झालेली अवस्था लज्जास्पद आहे… जेथे गुलांमाना मुक्त करून दुसरा जन्म मिळाला त्या दिक्षाभुमीची अवस्था पाहिल्या जाण्यासारखी नाही…
दिक्षाभुमी च्या भवताल मातीच दिसेल… (पार्किंग बांधकाम पुर्वी सुध्दा मातीच होती म्हणून ते कारण देऊन दोष झाकण्याचा प्रयत्न करू नका )

कंपाऊंड वॉल अनेकठिकाणी अक्षरशः तुटली , बाहेरील लोखंडी बॅरीगेट जंगाने सडलेत… मुख्य स्तुपाच्या भोवतालच्या प्लीनमध्ये मातीच माती आणि त्यात काटेरी झुडपे, गवत वाढतयं… , स्तुप आणि मुख्य इमारतीमध्ये अनेक ठिकाणी भेगा पडल्यात , प्लास्टर पडत आहे , स्टाईल पडत आहे ,

काही ठिकाणी बांधकामातील लोखंडी रॉड (गज) उघडे पडले , काही बाजु अनुयायांसाठी बंद आहेत म्हणून ते तर कुणाला दिसतच नाही तेथील अवस्था कशी असेल कोण जाणे???

याव्यतिरिक्त जगभरातील असंख्य अनुयायांचे प्रेरणास्थान असलेल्या दिक्षाभुमीवर रोज शेकडो अनुयायी येतात माञ तेथे कुठले विश्रामगृह नाही ,
खायची -रहायची व्यवस्था नाही… एवढच काय तर येणाऱ्या अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची सुध्दा योग्य व्यवस्था नाही ,

वॉशरूम-टॉयलेट ची योग्य व्यवस्था नाही… या सर्व गोष्टींचे माझ्याकडे पुरावे सुध्दा आहेत…कमेंट मध्ये सर्व फोटो टाकलेत… एकदा बघून घ्या…

आंबेडकरी समाज माञ इतर धर्मांवर टीका टिप्पणी करण्यात व्यस्त आहे माञ तो हा विचार करत नाहीत की इतर धर्मीयांच्या मंदिरे , ठिकाणं आणि प्रेरणास्थानाला त्यांनी सोन्याचांदीच्या पञ्यांनी मळविलयं… आणि आमचं काय ??? आमच्या या प्रेरणास्थळांच काय ? आम्ही झोपलोयं की झोपेच सोंग करतोयं ?
मला पुर्ण विश्वास आहे की आम्ही सोन्याचांदीपेक्षा महाग धातुने आमची दिक्षाभुमी मळवु शकतो परंतु आता सध्या लढणे गरजेचे..
मात्र यात दोष कुणाचा ?
दोष आहे दिक्षाभुमीची व्यवस्था पाहण्यासाठी असलेल्या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभुमी स्मारक समीतीचा.
समीती कशासाठी ?
ही दीक्षाभूमी स्मारक समिती (परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) दीक्षाभूमीच्या व्यवस्थापन,
देखभाल आणि विकासाची जबाबदारी सांभाळणारी मुख्य संस्था आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली, त्यानंतर या ऐतिहासिक स्थळाच्या जतनासाठी या समितीची स्थापना करण्यात आली.
समितीची मुख्य उद्दिष्टे आणि कार्ये –
स्मारक व्यवस्थापन करणे….सांचीच्या स्तूपाच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या भव्य दीक्षाभूमी स्तूपाची देखभाल करणे….
धार्मिक व सामाजिक कार्यक्रम जसे धम्मचक्र प्रवर्तन दिन, डॉ. आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) आणि बुद्ध पौर्णिमेसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे…
सुविधांची निर्मिती करणे…दीक्षाभूमी परिसरात येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी यात्री निवास (गेस्ट हाऊस), संशोधन ग्रंथालय, संग्रहालय आणि सभागृहाची व्यवस्था करणे…
तत्वज्ञानाचा प्रचार करणे….भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध संमेलने आणि शैक्षणिक चर्चासत्रांचे आयोजन करणे…
आता विचार करा वरीलपैकी एकतरी कार्य ही समीती करत आहे का ?
उत्तर हे भुतकाळापासुन आजपर्यंत नकारार्थीच मिळेल आणि त्याचे कारण आहे… ही समीतीच RSS विचारधारेच्या लोकांनी भरलेली आहे…
आत्ताआत्ता अनेक बाबी घडल्यात पार्किंग बांधकाम असेल… समीतीचे अध्यक्ष भदंत आर्य सुरेई ससाई यांनी महिलेवर हात उगारणे असेल अथवा आता कॉग्रेस ने बॅनर मध्ये दिक्षाभुमीवर चक्क भगवा झेंडा दाखविणे असेल… हे सर्व का होतयं? याला जबाबदार कोण ? कुणी याची काळजी घ्यावी ? कुणी याच्या विरोधात सर्वात पहील्यादा कारवाई करावी ? तर स्मारक समितीने … माञ असे होतांना तर आम्हाला दिसत नाही…
याव्यतिरिक्त दिक्षाभुमीची जर ही अवस्था आहे तर दिक्षाभुमीवर मिळणारे भरगच्च दान कुठे जाते ? हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे… माञ आम्हाला काय ?
आम्ही मजेत जगतोयं , बाबासाहेबांनी दिलेलं खाताखावल्या जात नाही आम्हाला आता… तोंड आणि पोट गच्च भरलेलं आहे आमचं आणि आमच्या पुढील पिढ्यांना सुध्दा कमी पडणार नाही बाबासाहेबांनी दिलेलं… मग आम्ही कशाला दिक्षाभुमीचा विचार करायचा ?
आम्ही आज IAS पासुन तर चपराशी पर्यंत सर्वच सरकारी पदांवर आहोत… कमीत कमी 40 हजार पासुन तर लाखो रुपयांपर्यंत पगार आहे आम्हाला , अनेकजण उद्योजक बनलोत… भरमसाठ पैसा आहे… फक्त आमची मनस्थीती नाही काही करायची… म्हणून दोष फक्त स्मारक समीतीला जात नाही आम्ही सुध्दा दोषी आहोत…
आभार 🙏🏻

प्रा.पंकज इंगळे
(निर्भीड वक्ते , समग्र संविधान व अनरीवल्ड आंबेडकर या सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक , प्रखर विचारवंत, संविधान अभ्यासक)
8766981359
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 08,2026 | 19:20 PM
WebTitle – deekshabhoomi-neglect-raises-serious-questions-on-management























































