1929 मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी ‘पूर्ण स्वराज’ अर्थात ब्रिटीश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची हाक दिली तेव्हा 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून निवडला गेला. 1930 पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत काँग्रेस पक्षाने 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता.स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० हा प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेला. या तारखेला भारत औपचारिकपणे एक सार्वभौम देश बनला आणि ब्रिटीश अधिराज्य अंमल पूर्णपणे संपला.१५ ऑगस्ट ला भारत स्वतंत्र होईल हे कोणी ठरवलं, ही तारीख निवडताना जपान चा विचार का केला होता? याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
३० जून १९४८ पर्यंत स्वातंत्र्य मिळवायचे होते
आता प्रश्न पडतो की १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन कसा ठरला? हीच तारीख का निवडली?
लॉर्ड माउंटबॅटन यांना ब्रिटिश संसदेने ३० जून १९४८ पर्यंत सत्ता हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.
माऊंटबॅटनने सत्ता हस्तांतरित करण्यासाठी जून 1948 पर्यंत वाट पाहिली असती, तर हस्तांतरित करण्याची शक्ती उरली नसती,
असा विश्वास सी राजगोपालाचारी यांनी व्यक्त केला.अशा परिस्थितीत माउंटबॅटन यांनी तारीख बदलून ऑगस्ट 1947 केली.
माऊंटबॅटनने त्यावेळी दावा केला होता की तारीख पुढे करून आपण रक्तपात किंवा दंगली होणार नाही याची खात्री करत आहोत.
अर्थात तो दावा चुकीचा सिद्ध झाला. नंतर त्यांनी आपल्या निर्णयाचे औचित्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला
“जिथे जिथे वसाहतवादी राजवट संपली आहे तिथे रक्तपात झाला आहे. हीच किंमत तुम्हाला चुकवावी लागते.”
माउंटबॅटनच्या माहितीवर आधारित, भारतीय स्वातंत्र्य विधेयक Indian Independence Bill 4 जुलै 1947 रोजी ब्रिटीश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सादर करण्यात आलं आणि पंधरवड्याच्या आत पास झाले. या कायद्याने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतातील ब्रिटीश राजवट संपुष्टात आणली आणि भारत आणि पाकिस्तान या दोन सार्वभौम देशांची अधिकृत स्थापना झाली. दोन्ही देशांना ब्रिटिश कॉमनवेल्थमधून वेगळे होण्याची परवानगी देण्यात आली.
माउंटबॅटन यांनी जपानचा विचार का केला?
फ्रीडम अॅट मिडनाईटमध्ये, माउंटबॅटन असे म्हणतात, “मी निवडलेली तारीख अचानक प्रकट झाली. एका प्रश्नाच्या उत्तरात मी हे निवडले. या संपूर्ण घटनेचा सूत्रधार मीच आहे हे दाखवण्याचा माझा निश्चय होता.जेव्हा मला विचारले गेले की काही तारीख निश्चित केली आहे का? मला माहित होते की हे आता लवकरच होणार आहे. पण तोपर्यंत मी नीट विचार केला नव्हता. मला वाटलं की तारीख ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या आसपास असेल आणि मग मी 15 ऑगस्टची तारीख दिली कारण हा दिवस जपानच्या आत्मसमर्पणाचा दुसरा वर्धापन दिन होता .” 15 ऑगस्ट 1945 रोजी कोरियन द्वीपकल्प जपानच्या क्रूर राजवटीतून मुक्त झाला होता.
१५ ऑगस्ट 1945 रोजी जपान चे तत्कालीन सम्राट हिरोहितो यांनी राष्ट्राला उद्देशून एक रेकॉर्ड केलेला रेडिओ संदेश दिला, जो नंतर ज्वेल व्हॉइस ब्रॉडकास्ट म्हणून ओळखला जातो.या रेडिओ संबोधनात त्यांनी मित्र राष्ट्रांच्या समक्ष शरणागती पत्करल्याची घोषणा केली.माउंटबॅटन यांनी आठवण करून दिली की त्यांनी त्या दिवशी जपानी शरणागतीची Surrender of Japan बातमी चर्चिलच्या खोलीत बसून ऐकली होती आणि दक्षिण पूर्व आशिया कमांडचे सर्वोच्च सहाय्यक कमांडर म्हणून 4 सप्टेंबर 1945 रोजी जपानच्या औपचारिक आत्मसमर्पणावर स्वाक्षरी करणारे माउंटबॅटन हेच होते.
यंदा ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे की ७७ वा?
भारताने 1947 मध्ये पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि म्हणूनच हे वर्ष 77 वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जायला हवा,
परंतु अधिकृतपणे 76 वा स्वातंत्र्यदिन या वर्षी साजरा केला जात आहे.
आझादी का अमृत महोत्सवासह यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ‘राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम’ अशी आहे.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हौतात्म्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचे मूल्य समजून घेणे गरजेचे
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जातिवाद संपलेला नाही-सर्वोच्च न्यायालय
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 12,2023 | 22:05 PM
WebTitle – Who decided that India will become independent on 15th August, why was Japan considered while choosing this date?