१ मे २०२५ | पुणे : पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी होत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला सात गावांच्या शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झटापट झाली. या संघर्षात पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये कुंभारवळण गावच्या ६० वर्षीय अंजनाबाई कामटे या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
ड्रोन सर्वेक्षणासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अडवले
प्रशासनाकडून विमानतळ प्रकल्पासाठी वनपुरी, एखतपूर, उदाचीवाडी, कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण सुरू केले होते. मात्र, जमीन संपादनाविरोधी शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षणाला रोखण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. आज सकाळी ड्रोन सर्वेक्षणासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अडवले. यानंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बळ मागवले होते.

पुरंदर विमानतळ प्रकल्प विरोधात आंदोलन; लाठीचार्जमध्ये ६० वर्षीय महिलेचा मृत्यू
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये हुज्जत झाली. पोलीसांनी अश्रूधुराचा वापर करून लाठीचार्ज केला.
या मारहाणीत अनेक जण जखमी झाले, तर कुंभारवळण गावच्या अंजनाबाई कामटे यांचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी पोलीसांवर महिलेच्या मृत्यूबद्दल आरोप केला आहे.
मृत महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनवर
घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस दल परिसरातून माघारी घेत असताना शेतकरी आंदोलक आक्रमक राहिले झाले असून मृत महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनवर ठेवण्यात आला असून, गावकऱ्यांनी या घटनेवर तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुमारे २,७०० हेक्टर जमीन संपादित करण्याची योजना आखण्यात आली आहे, मात्र या योजनेला सात गावातील शेतकरी आणि रहिवासी प्रभावित होत आहेत. त्यांनी जमीन संपादनाविरोधी आंदोलन सुरू केले आहे, ज्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये तणाव वाढत आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 03,2024 | 19:05 PM
WebTitle – purandar-airport-protest-farmer-police-clash-woman-dead