मिस्कोल्क, हंगेरी – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे देशात आहेत तसेच परदेशात सुद्धा अनेक ठिकाणी आहेत.त्यांना विश्वरत्न याचसाठी म्हटलं जातं.तमाम भारतीयांना माणसांत आणणारे बाबासाहेब आज जागतिक पातळीवर प्रेरणा ठरले आहेत,असमानता,विषमता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा देणारे सामाजिक न्यायाच्या संदेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हंगेरीच्या मिस्कोल्क शहरातील एका कारखान्यात अनोखा कार्यक्रम पार पडला. युरोपमधील रोमा (जिप्सी) समुदायाचे हक्क मिळवण्यासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही आंबेडकर जयंती साजरी केली.

“जय भीम”चा घोष: कारखान्यात काम करणाऱ्या रोमा समुदायाच्या कामगारांनी आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर भाषणे दिली.

बुद्ध धम्म दीक्षा: डॉ. आंबेडकरांच्या मार्गावर चालत, काही सहभागींनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला.
हंगेरीमधील रोमा समुदायाचे नेते टिबोर डेर्डाक यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांप्रेरणा घेऊन “जय भीम नेटवर्क” स्थापन केले आहे.
त्यांच्या प्रयत्नांमुळेच मिस्कोल्कसह हंगेरीच्या अनेक गावांमध्ये “डॉ. आंबेडकर शाळा” सुरू झाल्या आहेत.

आंबेडकरी चळवळीची जागतिक पोच:

हंगेरी सारख्या शहरात आंबेडकर एक प्रेरणास्त्रोत ठरले आहेत
भारताबाहेरही बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी ठरत आहेत.
रोमा समुदायाचा संघर्ष: युरोपमध्ये जातीय भेदभव झेलणाऱ्या या समुदायाला आंबेडकरी विचारांमुळे नवे बळ मिळाले आहे.
“जग जागे करणारा आंबेडकरी विचार आता हंगेरीच्या शहरातूनही ऐकू येतोय!”
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 18,2024 | 13:59 PM
WebTitle – Ambedkar Jayanti Celebrated in Hungarian Factory: ‘Jai Bhim’ Echoes in European Workers’ Hub