नागपूर 14-10-2026 | “आम्ही स्वतंत्र दबाव गट आहोत; आमची निष्ठा देशाच्या Gen Z सोबत आहे. आवाज कोणासोबत उठवला यापेक्षा तो उठवणे महत्त्वाचे आहे,” अशी भूमिका Cockroach Janata Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मांडली. नागपूर दीक्षा भुमी येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी इंडिया आघाडीशी संबंध, आंदोलनासाठी कथित परदेशी फंडिंग, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका, मतदारयादीतून नावे वगळण्याचे आरोप आणि भाजपच्या टीकेवर उत्तरे दिली.
इंडिया आघाडी आणि CJP यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत दिपके म्हणाले की, दोघेही एकाच उद्देशासाठी लढत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील लढा आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा हा आंदोलनाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
‘CJP स्वतंत्र दबाव गट; इंडिया आघाडीला विरोध नाही’
CJP इंडिया आघाडीसोबत आंदोलन करणार की स्वतंत्रपणे, असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर दिपके यांनी CJP हा स्वतंत्र दबाव गट असून तो आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
मात्र, स्वतंत्र राहण्याचा अर्थ इंडिया आघाडीला विरोध करणे असा होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर काढलेला मोर्चा योग्य आहे का, असे विचारल्यावर त्यांनी त्याला समर्थन दिले.
त्यांच्या मते, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन करणे हा विरोधी पक्षांचा अधिकार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
सर्वोच्च न्यायालय ही स्वतंत्र संस्था असल्याने त्यावर आरोप करणे योग्य आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.
त्यावर दिपके यांनी पक्षफुटी, निवडणूक चिन्ह गोठवण्याची प्रकरणे आणि मतदारांचे मतदानाचे हक्क हिरावले गेल्याच्या कथित घटनांचा संदर्भ दिला.
पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीच्या वेळी मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एखाद्या मतदाराला एका निवडणुकीत मतदान करता आले नाही, तर पुढच्या निवडणुकीत मतदान करा, अशी भूमिका स्वीकारली जात असेल, तर हाच निकष नरेंद्र मोदी यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना लागू केला जाईल का, असा सवाल त्यांनी केला.
फंडिंग आणि ‘अर्बन नक्षल’ आरोपांवर अमित शाह यांना आव्हान
CJP च्या आंदोलनावर ‘अर्बन नक्षल’ गटांचा वॉच असल्याचे आणि आंदोलनाला बाहेरून निधी मिळत असल्याचे आरोप होत असल्याबाबत
दिपके यांना विचारण्यात आले. ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी असे आरोप केल्याचा संदर्भही प्रश्नात देण्यात आला.
यावर दिपके यांनी साळवे यांना त्यांच्याकडे असलेले पुरावे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन केले.
आरोप करण्याऐवजी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, असे खुले आव्हान त्यांनी भाजप आणि अमित शाह यांना दिले.
‘पाकिस्तानची भाषा’ या आरोपावर एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत असल्याच्या एकनाथ शिंदे यांच्या आरोपावर दिपके यांनी प्रत्युत्तर दिले.
प्रत्येक मुद्द्यावर अमेरिका, चीन आणि पाकिस्तानचा संदर्भ देण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी CJP उभे राहील, असे सांगतानाच शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना केवळ हेलिकॉप्टरमधून दौरे करण्यासाठी निवडून दिले आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘आंदोलन करणे संविधानविरोधी कधी झाले?’
देशात अराजकता किंवा गृहयुद्ध घडवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या भाजपच्या आरोपांवर
दिपके यांनी संविधानातील कलम १९ अंतर्गत अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा संदर्भ दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूलभूत अधिकारांनुसार आंदोलन करणे संविधानविरोधी कसे ठरते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याच संदर्भात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आणि स्वातंत्र्यलढ्यातील संघाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला.
आपल्याला मूलभूत अधिकार (Fundamental Rights) आर्टिकल 19 अनुसार that is right to protest हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे.
तो कधीपासून संविधानाच्या विरोधात झाला? आपलं नशीब हे लोक इंग्रजांच्या काळात नव्हते.
नाहीतर हे गांधीजींना म्हणाले असते की हे देशाच्या विरोधात काम करत आहेत.
कारण यांना सवयच होती ब्रिटिशांचे बूट चाटण्याची,यांनी देशासाठी काही केले का?
संघाचा आरएसएसचा एक तरी माणूस मला सांगा जो स्वातंत्र्य लढ्यात होता.
यांनी फक्त ब्रिटिशांची चापलूशी केली आहे.आणि आजही हे लोक तेच करत आहेत,हे कधीच देशाच्या अन संविधानाच्या सोबत उभे राहणारे नाहीत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा उल्लेख
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता विचार आजही महत्त्वाचा वाटतो,
असे विचारल्यावर दिपके यांनी सामाजिक न्याय आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या विचारांचा उल्लेख केला.
समाजातील प्रत्येक व्यक्तीवर अन्याय होत असेल, तर तिच्या बाजूने उभे राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
तसेच, समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे, हा आंबेडकरांचा विचारही त्यांनी अधोरेखित केला.
सोशल जस्टीस सामाजिक न्याय हा जो बाबासाहेबांचा विचार होता,प्रत्येक व्यक्तीसोबत उभं राहिलं पाहिजे,त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.हा विचार आम्ही मानतो आणि दूसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की “मी कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजतो.”
(इंग्रजीत: “I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved.”) आम्हीही याच विचारांवर चालतो.
आप, तृणमूल, डावे पक्ष आणि महाराष्ट्रातील पक्षांच्या समर्थनाचा उल्लेख
CJP चा आम आदमी पार्टीशी संबंध असल्याच्या चर्चेवर दिपके यांनी उत्तर दिले की, आंदोलनाला विविध पक्षांनी समर्थन दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनाला समर्थन दिले आहे. मात्र, काही जणांचे लक्ष केवळ आम आदमी पार्टीकडेच असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘मतदारयादीत नाव नसेल तर बॅलेटपेपरपर्यंत पोहोचणार कसे?’
निवडणुका बॅलेटपेपरवर झाल्यास CJP स्वतः निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दिपके यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्वात मूलभूत समस्या मतदारयादीतून नावे वगळली जाणे ही असल्याचे सांगितले. मतदारयादीत नावच नसेल, तर बॅलेटपेपरवर मतदान करण्याचा प्रश्नच कसा येईल, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
आतापर्यंत १३ कोटी लोकांची नावे वगळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, या आकड्याचा कालावधी, व्याप्ती आणि अधिकृत स्रोत या संवादात स्पष्ट करण्यात आलेला नाही.
‘मला अटक करायची असेल तर करा; मी घाबरत नाही’
दिल्लीकडे रवाना होत असताना पुढील रणनीतीबाबत विचारले असता, दिपके यांनी कोणतीही विशेष रणनीती नसल्याचे सांगितले. अटक करायची असेल तर येथे करा किंवा विमानात करा, आपण घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिपके यांनी CJP ची स्वतंत्र राजकीय ओळख कायम ठेवण्यावर, निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांविरोधात आवाज उठवण्यावर आणि आंदोलनाच्या अधिकारावर भर दिला.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 14,2026 | 12:10 PM
WebTitle — abhijeet-dipke-interview-cjp-india-alliance-vote-theft-allegations






















































