नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वाहतूक सेवा पूर्णपणे बंद ठेवू नयेत, असे निर्देश दिले असतानाही दिल्ली मेट्रोची अनेक स्थानके बंद ठेवण्यात आल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून मेट्रो आणि रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घातल्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
ही अवमान याचिका केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव (IAS) गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त (IPS) अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (DMRC) अध्यक्षा (IAS) डी. थारा यांच्याविरोधात दाखल करण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
याचिकाकर्त्याने दिल्ली मेट्रोची अनेक स्थानके बंद ठेवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वाहतूक सेवा पूर्णपणे बंद न ठेवण्याचे निर्देश दिले असतानाही
प्रत्यक्षात स्थानके बंद ठेवण्यात आल्याने न्यायालयाच्या आदेशांचे पालन झाले का,असा प्रश्न या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय, रेल्वे सेवा विनाकारण रद्द केल्या जात असल्याचाही आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. मेट्रो स्थानकांवरील निर्बंध आणि रेल्वे सेवा रद्द करण्याच्या निर्णयांमुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून, दिल्लीतील दैनंदिन वाहतूक आणि जनजीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे याचिकेत म्हटल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.
रेल्वे सेवा विनाकारण रद्द केल्या जात असल्याचा आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात
संबंधित अधिकाऱ्यांनी कसूर केल्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे.
न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात संबंधित अधिकाऱ्यांनी कसूर केली असल्यास
त्यांच्याविरोधात अवमानाची कारवाई करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आल्याचा दावा आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 10,2026 | 10:40 AM
WebTitle — Several Delhi Metro stations closed; contempt of court petition filed.





















































