23 एप्रिल 2025 | श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी आतंकवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यामुळे तेथे असलेल्या पर्यटकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. घाबरलेले पर्यटक इकडे-तिकडे पळू लागले. अशा कठीण परिस्थितीत, सैयद आदिल हुसैन शाह नावाच्या एका घोडेवाल्याने धैर्य दाखवून दहशतवाद्यांच्या हातातील बंदूक छीनण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, या संघर्षात आदिल हुसैनचा मृत्यू झाला.
पर्यटकांच्या जीवाचे रक्षण करताना आतंकवाद्याशी झुंज दिली
सैय्यद आदिल हुसैन पहलगाम येथे पर्यटकांना घोड्यावर बसवून फेरफटका मारायचे काम करत होते. त्यांनी एका दहशतवाद्याची रायफल छीनण्याचा धाडसी प्रयत्न केला. सैयद आदिल हुसैन शाह पर्यटकांना कार पार्किंगमधून बैसारन (घासाचे मैदान) पर्यंत नेण्याचे काम करत असत. ही जागा पायीही पोहोचता येते. बंदूक छीनण्याच्या प्रयत्नादरम्यान आतंकवाद्यांनी त्यांना गोळी घातली. आदिल शाह त्यावेळी टट्टूवर बसवून नेण्यात आलेल्या पर्यटकाचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करत होते.

कुटुंबातील एकमेव कमावे सदस्य गमावले
माध्यमांच्या बातम्यांनुसार, अतिरेक्यांनी लोकांना अगोदर त्यांचा धर्म विचारला आणि नंतर कलमा वाचण्यास सांगितलं. यानंतर त्यांनी २८ पर्यटकांना ठार केले. सैयद आदिल हुसैन शाह हे या हल्ल्यात ठार झालेले एकमेव स्थानिक व्यक्ती आहेत तसेच आदिल हुसैन हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावे सदस्य होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुले आहेत. कुटुंबीयांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.
वडिलांची मागणी – “हत्यारांना कठोर शिक्षा मिळावी”
आदिलचे वडील, सैयद हैदर शाह यांनी एएनआयला सांगितले, “काल माझा मुलगा पहलगामला नेहमीप्रमाणे त्याच्याकामासाठी गेलेला. दुपारी सुमारे ३ वाजता, आम्हाला हल्ल्याबद्दल कळले. आम्ही त्याला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. नंतर, ४:४० वाजता त्याचा फोन चालू झाला, पण कोणी उत्तर दिले नाही. आम्ही ताबडतोब पोलिस स्टेशनला गेलो. तेव्हा आम्हाला कळले की त्याला हल्ल्यात गोळी लागली आहे. जे कोणी यासाठी जबाबदार आहेत, त्यांना कठोर शिक्षा मिळायला हवी.”
या घटनेमुळे संपूर्ण भागात शोकाचे वातावरण आहे.
लोकांचे म्हणणे आहे की आदिल शाह यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या धैर्याला कधीही विसरले जाणार नाही. पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि दोषींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 23,2024 | 18:25 PM
WebTitle – pahalgam-terror-attack-pony-rider-Syed Adil Hussain Shah -saved-tourists-martyred