19 एप्रिल 2025 | पुणे : गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणातील चौकशीसाठी ससून रुग्णालयाच्या समितीने दुसरा अहवाल सादर केला असून, यामध्ये मागील निष्कर्षात मोठा बदल करण्यात आला आहे. फक्त २४ तासांच्या आत समितीने आपला मतभेद बदलून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप ठेवला आहे. या अहवालाच्या आधारे रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास वर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याआधीच्या अहवालात डॉ. घैसास यांना निर्दोष मानण्यात आले होते, परंतु आता त्यांनाच प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.

ससून समितीची पलटी;डॉ. घैसास वर गुन्हा दाखल
तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या समितीकडून अहवाल सादर करण्याचे निर्देश होते. मात्र, अनेक वेळा विवादात गुरफटलेल्या ससून रुग्णालयाने या प्रकरणातही गोंधळ निर्माण केल्याचे आता उघडकीस आले आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या समितीकडून या प्रकरणातील अभिप्राय मागितला होता. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी हा अहवाल पोलिसांना सोपवला होता.
या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याची स्पष्ट टिप्पणी न करता, प्रकरणाची अस्पष्ट माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीला रुग्णालयाला दोषमुक्त समजण्यात आले होते. परंतु, या निष्कर्षावर आक्षेप नोंदवल्यानंतर समितीने पुनर्विचार करून डॉ. घैसास यांना दोषी ठरविण्यात आले. याचा परिणाम म्हणून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आता डॉ. घैसास यांच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया होणार आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 19,2024 | 18:58 PM
WebTitle – sassoon-panel-report-tanisha-bhise-death-case-dr-ghaisas-booked