उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशातील अलीगढ जिल्हयामध्ये आंबेडकरी समाजातील 6 डझनहून अधिक लोकांनी घराबाहेर ‘ये मकान बिकाऊ’चे बॅनर आणि (‘हे घर विक्रीसाठी आहे’) पोस्टर्स लावले आहेत. बिल्डरच्या छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. बिल्डर वसाहतीमध्ये उभारलेल्या उद्यानांमध्ये आंबेडकरी समाजाचे जयंती निमित्तचे कार्यक्रम होऊ देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना इथून स्थलांतर करावे लागत आहे.हे प्रकरण महुआ खेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉश कॉलनी असलेल्या सागवण शहरातील आहे. गेल्या वर्षी एका वेगळ्या प्रकरणात शामलीमध्ये ‘घर बिकाऊ’चे पोस्टरही लावण्यात आले होते आणि त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती.
घर विक्रीसाठी आंबेडकरी समाजाने लावले बॅनर
महुआ खेडा पोलीस स्टेशन हद्दीतील पॉश कॉलनी असलेल्या सागवान शहरात आंबेडकरी समाजातील ६ डझनहून अधिक लोकांनी ‘ये मकान बिकाऊ है’ चे बॅनर आणि पोस्टर्स लावले आहेत.तसेच, आम्हाला स्थलांतर करण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी बॅनरवर लिहिले आहे.नरेंद्र सागवान कॉलनीत बांधलेल्या उद्यानात बिल्डर आंबेडकरी समाजाचे कार्यक्रम होऊ देत नसल्याचा आरोप लोकांनी केला आहे.
14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती निमित्त कॉलनीतील लोक उद्यानात एक कार्यक्रम आयोजित करत होते.मात्र बिल्डरने हा कार्यक्रम होऊ दिला नाही,असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.जो कार्यक्रम देशाचे प्रधानमंत्री (नरेंद्र मोदी) आणि राज्याचे मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) देखील थाटामाटात साजरा करतात,तो कार्यक्रम हा जातीयवादी बिल्डर साजरा करू देत नाही, दुसरीकडे कॉलनीत उभारलेल्या या उद्यानांसाठीही आम्ही टॅक्स देखील भरतो असेही रहिवाशांनी म्हटलंय.
ते सांगतात की, 14 एप्रिल रोजी पोलिसांच्या संगनमताने बिल्डरने उद्यानात कार्यक्रमासाठी लावलेले तंबूही हटवले होते. त्यानंतर आम्ही सातत्याने पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांकडे गेलो. या संपूर्ण प्रकरणात आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही आमच्या घराबाहेर हे बॅनर पोस्टर्स लावले आहेत.
या संपूर्ण घटनेबाबत एसपी सिटी कुलदीप गुणवत सांगतात की,
ओझोन सिटीच्या मॅनेजरवर काही लोकांचा आरोप आहे की त्यांनी त्यांना आंबेडकर जयंती साजरी करू दिली नाही.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दोन्ही बाजूंना बोलावून चर्चा सुरू असून, सध्या परिस्थिती सामान्य आहे.या मुद्याची तपासानंतरच उकल होईल.
याआधी शामलीमध्येही काही लोकांनी घराबाहेर ‘…मकान बिकाऊ है’चे पोस्टर-बॅनर लावले होते.
यावरून यूपीच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. यासाठी स्थानिकांनी प्रशासन आणि पोलिसांवर आरोप केले गेले होते.
त्यांना मदत करण्याऐवजी पोलीस त्यांच्यावरच कारवाई करतात, असेही आरोप करण्यात आले होते.
बिल्डरचा अजब दावा,यांना वैयक्तिक हित साधायचे आहे
आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या लोकांकडून परवानगी मागितली होती, असे टेक सिटीचे संचालक नरेंद्र सागवान यांनी सांगितले. सागवान शहरात बांधलेल्या शाळेत आंबेडकर जयंती आयोजित करण्याबाबत मी बोललो आणि मी स्वत:ही आंबेडकर जयंती साजरी केली. आता हे लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत.
सागवान सिटीत सुमारे 500 कुटुंबे राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.आंबेडकर जयंती कार्यक्रमाबाबत कोणाचाही आक्षेप नाही.यावरून राजकारण करणारे मोजकेच लोक आहेत.ज्यांना दबाव आणून त्यांना आपले वैयक्तिक हित साधायचे आहे.असा अजब दावा केला आहे.
सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक स्तरावर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
साजरी करण्यात काय वैयक्तिक हित साधायचे असते हे मात्र कळू शकले नाही.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
Pan Masala Ad:अमिताभ,अजय,शाहरुख यांच्याविरोधात FIR दाखल
ज्ञानवापी प्रकरणी फेसबुक पोस्ट ; डॉ. रतन लाल यांना अटक
MP:दलित वराच्या वरातीवर दगडफेक,सरकारने पाडली बुलडोझरने घरे
विधवा प्रथा : समाज मनाचा दृष्टिकोन अन् मानसिकता बदलली पाहिजे..
ज्ञानवापी मशिद मुद्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे?
भगवान बुद्ध आणि माझा खास संबंध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 23, 2022 09:06 AM
WebTitle – ‘This house is for sale’ Banners put up by Ambedkarites outside their homes in uttar pradesh