यूपीप्रमाणेच मध्यप्रदेश सरकार कडूनही आता बुलडोझरचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील राजगढ जिल्ह्यातील जिरापूरमध्ये एका हिंदू-दलित वराच्या मिरवणुकीवर दुसऱ्या समाजाच्या लोकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून, त्यानंतर प्रशासनाने आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवत घरे जमीनदोस्त करून टाकली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका हिंदू-दलित वराच्या मिरवणुकीवर दुसऱ्या समाजाच्या लोकांनी दगडफेक केली. गुरुवारी जिरापूरमध्ये प्रशासनाकडून झालेल्या कारवाईत किमान 48 घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या घरांबाबत प्रशासनाने सांगितले की, ही सर्व सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली घरे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक मशिदीच्या बाहेरून जात असताना अल्पसंख्याक समाजातील काही सदस्यांनी मोठ्या आवाजातील संगीताला आक्षेप घेतला.
मोठ्या आवाजावरून वाद?
राजगडचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, रेकॉर्ड केलेल्या जबाबानुसार, वराची मिरवणुक मशिदीजवळून जात असताना संगीताचा आवाज कमी करण्यात आला होता. ते म्हणाले की – “असे असताना दोन समुदायातील सदस्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर दगडफेक झाल्याची माहिती मिळाली ज्यामध्ये सहा वर्षांच्या मुलासह किमान पाच जण जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही आठ जणांना अटक केली आहे.
प्रदीप शर्मा यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील आरोपींनी त्यांच्या समाजातील महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे,
मात्र अद्यापपर्यंत याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. ते म्हणाले-
“सुरुवातीला एफआयआरमध्ये सहा जणांची नावे होती पण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. 21 आरोपींची ओळख पटली आहे. यातील सहा आरोपींचे शस्त्र परवानेही पोलिसांनी निलंबित केले आहेत.
एकूण 48 घरे पाडण्यात आली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच जिरापूर वॉर्ड क्रमांकाच्या लोकांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीसद्वारे त्यांना त्यांचे घर सरकारी जमिनीवर बांधल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते तोडण्याची कारवाई करण्यात आली. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा अधिकार्यांच्या पथकाने जिरापूरमध्ये 18 घरे पाडली आणि त्यानंतरच्या कारवाईत आणखी 30 घरे अंशत: पाडण्यात आली.
याबाबत माहिती देताना जिरापूरचे तहसीलदार ए.आर.चिरमण म्हणाले की, एकूण 48 घरे पाडण्यात आली आहेत.
त्यापैकी 18 घरे ही आरोपी असेल्यांची आहेत.
सार्वजनिक जमीन असलेल्या माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून ही 30 घरे अनधिकृतपणे बांधण्यात आली होती.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
विधवा प्रथा : समाज मनाचा दृष्टिकोन अन् मानसिकता बदलली पाहिजे..
ज्ञानवापी मशिद मुद्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे?
भगवान बुद्ध आणि माझा खास संबंध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
एलआयसी इंडिया शेअर पहिल्याचदिवशी डाउन,लोकानी फिरवली पाठ?
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 20, 2022 20:58 PM
WebTitle – MP: The government demolished the houses of the accused who threw stones at the Dalit groom’s wedding show with bulldozers